ये क्या हो रहा है! दिशा पाटनी आता कोणाला करतेय डेट? पंजाबी गायकासोबत व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 11:56 IST2026-01-13T11:55:14+5:302026-01-13T11:56:42+5:30

नुपूर सनॉनच्या लग्नात एकत्र दिसले लव्हबर्ड्स, कोण आहे दिशाचा नवा बॉयफ्रेंड?

disha patani and punjabi singer talwinder dating rumours both attended nupur sanon s wedding in udaipur | ये क्या हो रहा है! दिशा पाटनी आता कोणाला करतेय डेट? पंजाबी गायकासोबत व्हिडीओ व्हायरल

ये क्या हो रहा है! दिशा पाटनी आता कोणाला करतेय डेट? पंजाबी गायकासोबत व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री दिशा पाटनीचं नाव आजपर्यंत अनेकांसोबत जोडलं गेलं. टायगर श्रॉफसोबत तिचं अफेअर गाजलं होतं. नंतर त्यांच्या ब्रेकअपचीही जोरदार चर्चा झाली. मधले काही दिवस ती अलेक्झांडर नावाच्या फिटनेस ट्रेनरसोबतही दिसली. आता दिशा पंजाबी गायक तलविंदरला डेट करत असल्याची चर्चा आहे. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

अभिनेत्री क्रिती सनॉनची बहीण नुपूर सनॉन नुकतीच लग्नबंधनात अडकली. उदयपूरमध्ये नुपूर आणि गायक स्टेबिन चा भव्य विवाहसोहळा पार पडला. या लग्नाला दिशा पाटनीही पोहोचली होती. नुपूरच्या लग्नावरुन परत येताना ती विमानतळावर गायक तलविंदरसोबत दिसली. दोघं एकत्रच विमानतळावर पोहोचले. पापाराझी त्यांना कॅमेऱ्यात कैद करु नये म्हणून मुंबईत आल्यानंतर तलविंदर दिशाच्या पुढे गेला.  त्यांच्यासोबत मौनी रॉयही होती. मौनी रॉयने तलविंदरला जाताना मिठी मारली.  याच व्हिडीओवरुन सोशल मीडियावर त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत.


याशिवाय त्यांचा नुपूरच्या लग्नातला एक व्हिडीओही रेडिटवर व्हायरल झाला आहे. यामध्ये दोघं एकमेकांसोबत हसताना दिसत आहेत. 'ये कब हुआ', 'तलविंदरने चेहरा कधी रिव्हील केला?', अशा कमेंट्स व्हिडीओवर आल्या आहेत.

Disha Patani with Talwinder at Stebin Nupur Wedding
byu/bollyfanboi inBollyBlindsNGossip

तलविंदर पंजाबचा प्रसिद्ध गायक आहे. तो कायम मास्क लावूनच स्टेज शो करतो. अनेक वर्ष त्याचा चेहरा कोणीही पाहिला नव्हता. कार्तिक आर्यनच्या नुकत्याच रिलीज झालेल्या तू मेरी मै तेरा, मै तेरा तू मेरी' सिनेमातलं 'तेनु जादा मोहोब्बत' गाणं तलविंदरचंच आहे. तर दुसरीकडे दिशा पाटनी आगामी 'वेलकम टू द जंगल','ओ रोमिओ' या सिनेमांमध्ये दिसणार आहे. 

Web Title: disha patani and punjabi singer talwinder dating rumours both attended nupur sanon s wedding in udaipur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.