Dhurandar Box Office: रणवीर सिंगच्या 'धुरंदर'ने पहिल्याच दिवशी धुव्वा उडवला! बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 12:00 IST2025-12-06T11:58:32+5:302025-12-06T12:00:13+5:30
रणवीर सिंगच्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुव्वा उडवला आहे. 'धुरंदर'चं पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोटींमध्ये कमाई केली आहे.

Dhurandar Box Office: रणवीर सिंगच्या 'धुरंदर'ने पहिल्याच दिवशी धुव्वा उडवला! बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
Dhurandar : बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित रणवीर सिंगचा 'धुरंदर' सिनेमा अखेर शुक्रवारी(५ डिसेंबर) सर्वत्र प्रदर्शित झाला. या अॅक्शन-थ्रिलर सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. 'धुरंदर'च्या अॅडव्हान्स बुकिंगलाही चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला होता. प्रदर्शित होताच रणवीर सिंगच्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुव्वा उडवला आहे. 'धुरंदर'चं पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोटींमध्ये कमाई केली आहे.
रणवीर सिंग, आर माधवन, संजय दत्त, सारा अर्जुन, अर्जुन रामपाल अशी तगडी स्टारकास्ट असलेला 'धुरंदर' सिनेमाची ट्रेलरपासूनच चर्चा होत होती. ट्रेलरपासूनच या सिनेमाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक होते. त्यामुळे 'धुरंदर' बघायला चाहत्यांनी थिएटरमध्ये गर्दी केली होती. पहिल्याच दिवशी सिनेमाचे शो हाऊसफूल झालेले पाहायला मिळाले. सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, 'धुरंदर' सिनेमाने पहिल्याच दिवशी कोटींमध्ये कमाई केली आहे. या सिनेमाने प्रदर्शनाच्या दिवशी २७ कोटींचा गल्ला जमवला आहे. आता वीकेंडला 'धुरंदर' सिनेमा किती कमाई करतो, हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.
'धुरंदर' सिनेमाचं दिग्दर्शन आदित्य धारने केलं आहे. सिनेमात रणवीर सिंगने हमजा अली, संजय दत्तने एसपी चौधरी अस्लम, अक्षय खन्नाने रहमान डकैत या भूमिका साकारल्या आहेत. अर्जुन रामपाल मेजर इक्बाल तर आर माधवन अजय संन्याल यांच्या भूमिकेत आहे. याशिवाय मानव गोहिल, राकेश बेदी, सारा अर्जुन, क्रिस्टल डिसुझा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.