धर्मेंद्र यांचं अस्थी विसर्जन मुलांच्या ऐवजी नातू करण देओलने का केलं? पुजाऱ्याने सांगितलं खरं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 16:41 IST2025-12-04T16:35:39+5:302025-12-04T16:41:23+5:30
धर्मेंद्र यांचं काल हरिद्वारला अस्थी विसर्जन झालं. यावेळी धर्मेंद्र यांची मुलं सनी-बॉबीने अस्थी विसर्जन न करता धर्मेंद्र यांचा नातू करण देओलने सर्व विधी केले. काय आहे यामागचं कारण?

धर्मेंद्र यांचं अस्थी विसर्जन मुलांच्या ऐवजी नातू करण देओलने का केलं? पुजाऱ्याने सांगितलं खरं कारण
बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचं २४ नोव्हेंबर रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झालं. धर्मेंद्र यांच्या निधनामुळे बॉलिवूड आणि सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. धर्मेंद्र यांच्या निधनामुळे देओल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशातच धर्मेंद्र यांचं काल हरिद्वारला अस्थी विसर्जन झालं. यावेळी धर्मेंद्र यांची मुलं सनी-बॉबीने अस्थी विसर्जन न करता धर्मेंद्र यांचा नातू करण देओलने सर्व विधी केले. काय आहे यामागचं कारण?
हरिद्वारचे पुजारी रोहित श्रोत्रिय यांनी यामागचा कारण सांगितलं. धर्मेंद्र यांच्या अस्थींचं विसर्जन बुधवारी हरिद्वार येथील हर की पौडी घाटावर करण्यात आलं. त्यावेळी धर्मेंद्र यांच्या कुटुंब उपस्थित होतं. परंतु काही कारणास्तव सनी आणि बॉबी देओल त्या ठिकाणी पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे करण देओलनेच पुढाकार घेऊन आजोबांचे अस्थी विसर्जन केलं. याशिवाय पिंडदान विधीही करणनेच केला. यावेळी सनी-बॉबी सोडले तर संपूर्ण कुटुंब या विधींमध्ये सहभागी झालं होतं.
सनी देओलचा संताप
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनाच्या सनी देओल काहीवेळाने पोहोचला. त्यावेळी काही पापाराझींनी त्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. यामुळे अभिनेता सनी देओल संतापला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये सनी देओल एका फोटोग्राफरकडे जाताना दिसतो. राग अनावर झालेल्या सनीने पापाराझीचा कॅमेरा हिसकावून घेतला आणि त्याला रागात विचारलं, "तुम्ही लोकांनी लाज विकली आहे का? तुम्हाला पैसे पाहिजेत? किती पैसे पाहिजेत?" अशा प्रकारे खासगी क्षणांमध्ये फोटो काढल्याबद्दल सनीने तीव्र नाराजी व्यक्त केली.
धर्मेंद्र यांच्या प्रार्थना सभेत हेमा मालिनींची गैरहजेरी
धर्मेंद्र यांची प्रार्थना सभा त्यांच्या निधनानंतर काही दिवसांनी पार पडली. या प्रार्थना सभेमध्ये संपूर्ण बॉलिवूड एकत्र आले असताना, दुसरीकडे धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी, अभिनेत्री हेमा मालिनी आणि त्यांच्या मुली, ईशा आणि आहना देओल या अनुपस्थित होत्या. त्यांच्या गैरहजेरीमुळे सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले होते. हेमा मालिनींना या प्रार्थना सभेसाठी देओल कुटुंबाकडून बोलवण्यात आलं नव्हतं, असं सांगण्यात येतंय. दरम्यान काही कलाकारांनी हेमा यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. धर्मेंद्र यांच्या निधनामुळे एक देखणं आणि जिंदादिल व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सर्वांच्या मनात आहे.