'वो शैतान मैं ही हूँ'; 'कॅप्टन मिलर'चा ॲक्शनपॅक्ड ट्रेलर रिलीज; धनुषच्या लूकची होतीये चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 09:40 AM2024-01-07T09:40:58+5:302024-01-07T09:41:30+5:30

Captain miller trailer: या सिनेमात ॲक्शन सीनचा भरणा असून धनुषचे डायलॉग्सही लोकप्रिय होताना दिसत आहेत.

dhanush-starrer-captain-miller-trailer-out-actor-ready-to-fight-tooth-and-nail-against-british-watch-video | 'वो शैतान मैं ही हूँ'; 'कॅप्टन मिलर'चा ॲक्शनपॅक्ड ट्रेलर रिलीज; धनुषच्या लूकची होतीये चर्चा

'वो शैतान मैं ही हूँ'; 'कॅप्टन मिलर'चा ॲक्शनपॅक्ड ट्रेलर रिलीज; धनुषच्या लूकची होतीये चर्चा

दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष (Dhanush) याचा बहुप्रतिक्षीत ठरलेला सिनेमा म्हणजे कॅप्टन मिलर (Captain Miller). या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक मोठ्या आतुरतेने या सिनेमाचे अपडेट जाणून घेण्यास उत्सुक होते. यामध्येच या सिनेमाचा दमदार ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. विशेष म्हणजे या सिनेमाच्या निमित्ताने धनुष पहिल्यांदाच एका वेगळ्या लूकमध्ये प्रेक्षकांसमोर आला आहे.

प्रदर्शित झालेला ट्रेलर हा २. ५४ मिनिटांचा असून या ट्रेलरमध्ये धनुषचे अनेक ॲक्शन सीन दिसून येत आहे. गावाचं आणि गावकऱ्यांचं शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी तो सतत लढा देत आहे. यासाठी कधी तो शत्रूंवर गोळीबार करतो तर कधी तलवारबाजी करतो. या सगळ्यात धनुषचा लूक हा आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे. 

या सिनेमात धनुष एका आगळ्या वेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर आला आहे. वाढलेले केस, दाढी आणि चेहऱ्यावर रागीट भाव असा त्याचा एकंदरीत लूक आहे. या सिनेमात धनुषचे जास्तीत जास्त अॅक्शन सीन पाहायला मिळणार असल्याचं या ट्रेलरमधून दिसून येत आहे.

दरम्यान,  या ट्रेलरमधील धनुषचे डायलॉग्सही लोकप्रिय होताना दिसत आहेत. 'तूने शैतान के बारे में सुना ही होगा. वो शैतान मैं ही हूं जिसे लोग प्यार से बोलते हैं कैप्टन मिलर.' हा डायलॉग सध्या लोकप्रिय होत आहे. येत्या १२ जानेवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात धनुष व्यतिरिक्त प्रियांका अरुल मोहन, शिवराज कुमार, निवेदिता सतीश, विनायकन आणि संदीप किशन हे कलाकार स्क्रीन शेअर करणार आहेत. हा सिनेमा हिंदीसह काही दाक्षिणात्य भाषांमध्येही रिलीज होणार आहे.

Web Title: dhanush-starrer-captain-miller-trailer-out-actor-ready-to-fight-tooth-and-nail-against-british-watch-video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.