"आवाज कहाँ तक जाएगी?? लाहौर तक...", 'बॉर्डर २'मध्ये सनी देओलची गर्जना; शत्रूला धडकी भरवणारा टीझर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 14:29 IST2025-12-16T14:28:52+5:302025-12-16T14:29:16+5:30
ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते तो 'बॉर्डर २'चा टीझर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. १९७१ साली झालेल्या भारत-पाक युद्धाच्या विजयी दिनी 'बॉर्डर २'चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

"आवाज कहाँ तक जाएगी?? लाहौर तक...", 'बॉर्डर २'मध्ये सनी देओलची गर्जना; शत्रूला धडकी भरवणारा टीझर
'बॉर्डर २'ची घोषणा झाल्यापासूनच या सिनेमाची सगळ्यांना उत्सुकता होती. ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते तो 'बॉर्डर २'चा टीझर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. १९७१ साली झालेल्या भारत-पाक युद्धाच्या विजयी दिनी 'बॉर्डर २'चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या 'बॉर्डर २'मधून कारगिल युद्धाचा इतिहास दाखवण्यात येणार आहे.
'बॉर्डर २'च्या टीझरमध्ये सुरुवातीलाच भारत-पाक युद्धभूमीवरचं चित्र दिसत आहे. फायटर प्लेन आणि बंदुकांच्या गोळ्यांचा आवाज ऐकू येत आहे. "तुम जहाँ से भी घुसने की कोशिश करोगे... आसमान से जमीन से समुंदर से...सामने एक हिंदुस्तानी फौजी खडा पाओगे जो आँखों मे आँखें डालकर सीना ठोककर कहेगा हिंमत है तो आ खडा है हिंदुस्तान...", सनी देओलचा आवाज ऐकून अंगावर शहारे येत आहेत. टीझरमध्ये अहान शेट्टी, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि सनी देओल शत्रुशी दोन हात करताना दिसत आहेत.
टीझरमधील सर्वात लक्ष वेधणारा सीन म्हणजे लष्कर अधिकारी असलेला सनी देओल त्याच्या इंडियन फौजला आवाहन करत विचारतो "आवाज कहाँ तक जाएगी?" आणि उत्तर येतं लाहौर तक". 'बॉर्डर २'च्या टीझरमझध्ये सनी देओलचा दमदार अवतार, दिलजीत दोसांझचा कटू आत्मविश्वास, अहान शेट्टीची निर्भिडता आणि धाडसी वरुण धवन पाहायला मिळत आहे. अनुराग सिंह यांनी 'बॉर्डर २'चं दिग्दर्शन केलं आहे. येत्या २३ जानेवारी २०२६ रोजी 'बॉर्डर २' सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.