"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 09:01 IST2025-07-26T09:01:18+5:302025-07-26T09:01:58+5:30
सलमान खानच्या अभिनेत्रीला एका चाहत्याने अजून लग्न केलं नाही म्हणून छेडलं. त्यावर अभिनेत्री काय म्हणाली? जाणून घ्या

"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
बॉलीवूड अभिनेत्री झरीन खानला वारंवार सोशल मीडियावर तिच्या लग्नाबद्दल विचारलं जातं. झरीनने अनेकदा या विषयावर बोलणं केलंय. पण एका चाहत्याने तिच्या पोस्टखाली कमेंट केली आहे. त्यामुळे झरीनला पुन्हा मौन सोडावं लागलंय. 'म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?' असं एक चाहता झरीनला म्हणाला. त्यामुळे झरीनने मोठा व्हिडीओ शेअर करत चाहत्याला आणि सर्वांनाच स्पष्ट शब्दात उत्तर दिलंय.
लग्न न करण्याबद्दल झरीन काय म्हणाली?
झरीन ३८ वर्षांची आहे. ती अजूनही सिंगल आहे. चाहत्याने केलेल्या कमेंटवर झरीन म्हणाली, लग्न करुन मी काय तरुण होणारेय का? पुढे तिने लग्न न करण्याची कारणं सांगितली. ती म्हणाली, "आजकालच्या काळात लग्न फार काळ टिकत नाहीत. अनेक जण फक्त दोन-तीन महिने एकत्र राहतात आणि मग वेगळे होतात. नातेसंबंधांमध्ये सच्चेपणा, समजूत आणि समर्पणाची कमतरता आहे. लोक आता स्वाइप करून नाती निवडतात, जणू काही खाद्यपदार्थ मागवतो तसं. यात माणसाची किंमतच उरलेली नाही."
झरीनने सांगितलं की, ती अजूनही सिंगल आहे आणि लग्नाचा विचार सध्या तरी करत नाही. ती म्हणाली, "लोक विचारतात, तू अजून लग्न का केलं नाही? पण मला अद्याप असा कोणी भेटलेला नाही, ज्याच्यासोबत आयुष्य घालवावं असं वाटेल. मी कुठल्याही दबावाखाली लग्न करणार नाही." झरीनच्या म्हणण्यानुसार, तिच्या घरच्यांनी तिच्यावर फारसा दबाव टाकलेला नाही. मात्र तिची आई अधूनमधून लग्नाची आठवण करून देते. "आई म्हणते, तू आता लग्न कर, पण मी तिला सांगते की मला अजून वेळ हवाय," असं झरीनने स्पष्ट केलं.