रणवीर सिंगच्या जागी हृतिक रोशन 'डॉन ३'मध्ये झळकणार? अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 17:00 IST2026-02-13T16:56:19+5:302026-02-13T17:00:14+5:30
फरहान अख्तरच्या 'डॉन ३' (Don 3) या बहुप्रतिक्षित चित्रपटात हृतिक रोशनची महत्त्वाची भूमिका असल्याची दाट शक्यता आहे. यावर आता हृतिकने मौन सोडलंय

रणवीर सिंगच्या जागी हृतिक रोशन 'डॉन ३'मध्ये झळकणार? अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला...
बॉलिवूडचा 'ग्रीक गॉड' हृतिक रोशन सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अशी जोरदार चर्चा होती की, फरहान अख्तरच्या 'डॉन ३' (Don 3) या बहुप्रतिक्षित चित्रपटात हृतिक रोशनची महत्त्वाची भूमिका असणार आहे. रणवीर सिंग मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटात हृतिक 'व्हिलन' किंवा विशेष भूमिकेत दिसणार अशा बातम्यांनी चाहत्यांची उत्सुकता वाढवली होती. मात्र, आता या सर्व चर्चा केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
व्हरायटी इंडियाला दिलेल्या मुलाखतीत हृतिक रोशनने याविषयी खुलासा केला.हृतिकला 'डॉन ३' साठी निर्मात्यांनी कोणताही संपर्क साधलेला नाही किंवा त्याला या चित्रपटासाठी विचारणा करण्यात आलेली नाही. स्वतः हृतिकनेही या अफवा असून तो कोणालाही रिप्लेस करत नाहीये, असं त्याने सांगितलं आहे. त्यामुळे हृतिकने मीडियाला या अफवांवर विश्वास ठेऊ नका, असं सांगितलं आहे.
'डॉन २' चित्रपटात हृतिक रोशनची एक छोटीशी झलक पाहायला मिळाली होती. तेव्हापासून हृतिकचा या फ्रँचायझीशी संबंध जोडला जात होता. तसेच, शाहरुख खानच्या जागी आता रणवीर सिंग 'डॉन'ची भूमिका साकारणार होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून 'डॉन ३'चा निर्माता फरहान अख्तर आणि रणवीर सिंग यांच्यात वाद सुरु असल्याने रणवीरने हा सिनेमा सोडल्याची चर्चा आहे. त्याच्या जागी हृतिक रोशनची वर्णी लागली, असं बोललं जात होतं. परंतु या अफवा असल्याचं स्पष्ट झालंय.