रणवीरचा 'धुरंधर' सिनेमा बघायला दीपिका पादुकोण जाणार का? अभिनेत्रीने दिलं 'हे' उत्तर, म्हणाली-
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 15:54 IST2025-12-05T15:50:39+5:302025-12-05T15:54:05+5:30
दीपिका पादुकोणने रणवीर सिंगच्या धुरंधर चित्रपटाबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. काय म्हणाली अभिनेत्री?

रणवीरचा 'धुरंधर' सिनेमा बघायला दीपिका पादुकोण जाणार का? अभिनेत्रीने दिलं 'हे' उत्तर, म्हणाली-
बॉलिवूडच अभिनेत्री दीपिका पादुकोणने ही सर्वांची लाडकी अभिनेत्री. दीपिकाचा पती आणि अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी 'धुरंधर' (Dhurandhar) चित्रपट आज रिलीज झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची सर्वांना जबरदस्त उत्सुकता आहे. अशातच दीपिका पादुकोण रणवीरचा हा चित्रपट बघायला जाणार का? असा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे. बघा काय म्हणाली दीपिका?
नुकतंच रणवीर गोव्यातील एका नातेावाईकाच्या लग्नात दीपिकासोबत सहभागी झाला होता. त्यावेळी सोशल मीडिया स्टार ओरीही त्यांच्यासोबत होता. ओरीने रणवीर-दीपिकाचा एक फोटो शेअर केला आहे. या लग्नाच्या समारंभात रणवीर आणि दीपिका यांनी ओरीची प्रसिद्ध 'सिग्नेचर पोज' रिक्रिएट केली.
हा व्हिडिओ ओरीने स्वतःच्या इंस्टाग्रामवर शेअर केला. ओरीच्या या व्हिडीओखाली दीपिकाने ''तू मला किती आवडतोस माहित आहे ना'', अशी कमेंट केली. याच पोस्टमध्ये रणवीरचा चित्रपट 'धुरंधर'च्या प्रदर्शनाबद्दल बोलताना ओरीने चाहत्यांना विचारलं, "शुक्रवारी माझ्यासोबत 'धुरंधर' कोण बघायला येणार???" या प्रश्नाला उत्तर देताना दीपिकाने अत्यंत उत्साहाने प्रतिसाद दिला आणि लिहिले, "मी! मी! मी!". अशाप्रकारे रणवीरच्या 'धुरंधर'बद्दल दीपिकाने चांगलाच उत्साह दाखवला आहे.
'धुरंधर' या स्पाय थ्रिलर चित्रपटात रणवीर सिंग एका रॉ एजंटच्या भूमिकेत आहे, जो पाकिस्तानमध्ये एका धोकादायक हेरगिरीच्या मोहिमेवर असतो. हा चित्रपट ३ तास आणि ३० मिनिटांच्या रनटाइमसह रणवीरच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार आहेत. आदित्य धर यांनी याचे दिग्दर्शन केले आहे आणि हा चित्रपट आज ५ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.