कार्तिक आर्यनचा साधेपणा! Five Star Hotel सोडून खाल्लं हातगाडीवरचं चायनीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 18:00 IST2021-11-15T18:00:00+5:302021-11-15T18:00:00+5:30
karthik aryan: बॉलिवूड सेलिब्रिटी कायमच त्यांचe स्टारडम जपत असतात. घरातून बाहेर पडतांनाही ते कायम त्यांच्या स्टारडमला शोभेल अशाच गोष्टी करतात.

कार्तिक आर्यनचा साधेपणा! Five Star Hotel सोडून खाल्लं हातगाडीवरचं चायनीज
बॉलिवूडसेलिब्रिटी कायमच त्यांच्या स्टारडम, लक्झरी लाइफस्टाइल यामुळे चर्चेत येत असतात. विशेष म्हणजे ही कलाकार मंडळी प्रत्येत ठिकाणी त्यांचा स्टारडम जपत असतात. घरातून बाहेर पडतांनाही ते कायम त्यांच्या स्टारडमला शोभेल अशाच गोष्टी करतात. यात खासकरुन साधं लंच किंवा डिनर करण्यासाठीही ते पंचतारांकित हॉटेलची निवड करतात. त्यामुळे या सेलिब्रिटींचा सामान्यांना कायमच हेवा वाटत असतो. परंतु, सध्या सोशल मीडियावर अभिनेता कार्तिक आर्यनची (karthik aryan) चर्चा रंगली आहे. कार्तिकने चक्क त्याचा स्टारडम विसरुन एका हातगाडीवरील चायनीजचा आस्वाद घेतला आहे.
सेलिब्रिटींना कोणतंही स्ट्रिटफूड खावसं वाटलं की त्यांचे शेफ त्यांना वेगवेगळे पदार्थ तयार करुन देत असतात. यात कलाकारांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. परंतु, कार्तिक आर्यनने त्याच्या आरोग्याची वा स्टारडमची कोणतीही पर्वा न करता थेट हातगाडीवरील चायनीजवर ताव मारला आहे.
प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानी यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर कार्तिकचा चायनीज खातानांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अलिकडेच कार्तिकने 'बिग बॉस १५' च्या मंचावर हजेरी लावली होती. यावेळी तो त्याच्या आगामी धमाका चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसला. मात्र, बिग बॉसच्या सेटवरुन बाहेर पडल्यानंतर थेट त्याने चायनीजची गाडी गाठली.
दरम्यान, कार्तिकला असं सर्वसामान्यांप्रमाणे रस्त्यावर चायनीज खातांना पाहिल्यावर त्याच्या साधेपणाचा अनेकांना हेवा वाटला. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर कार्तिकच्या या व्हिडीओची जोरदार चर्चा रंगली आहे.