'माझ्याशी पंगा घ्यायचा नाही..'; बॉलिवूडच्या हीमॅनने चक्क अंडरवर्ल्डला दिली होती धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 11:00 IST2026-02-20T11:00:00+5:302026-02-20T11:00:00+5:30

Dharmendra: धर्मेंद्र यांनी चक्क अंडरवर्ल्डलाच धमकी दिली होती. एका प्रसिद्ध दिग्दर्शकांनी धर्मेंद्र यांच्या बहादुरीचा हा किस्सा सांगितला आहे.

when-bollywood-he-man-dharmendra-threatened-underworld | 'माझ्याशी पंगा घ्यायचा नाही..'; बॉलिवूडच्या हीमॅनने चक्क अंडरवर्ल्डला दिली होती धमकी

'माझ्याशी पंगा घ्यायचा नाही..'; बॉलिवूडच्या हीमॅनने चक्क अंडरवर्ल्डला दिली होती धमकी

बॉलिवूडचे दिवंगत अभिनेता धर्मेंद्र (dharmendra) यांनी इंडस्ट्रीत त्यांचं एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. दमदार अभिनयासोबतच ते त्यांच्या निर्भीड, बिनधास्त स्वभावामुळेही ओळखले जायचे. अनेक कलाकारांनी त्यांच्या बहादुरीचे किस्सेही सांगितले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या याच अंदाजामुळे त्यांनी ही-मॅन हा टॅगही इंडस्ट्रीत मिळाला होता.  एकदा धर्मेंद्र यांनी चक्क अंडरवर्ल्डलाच धमकी दिली होती. एका प्रसिद्ध दिग्दर्शकांनी धर्मेंद्र यांच्या बहादुरीचा हा किस्सा सांगितला आहे.

धर्मेंद्र यांच्या बहादुरीचा हा किस्सा प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजीत पुरी यांनी सांगितला आहे. सत्यजीत यांनी 'फ्राइडे टॉकीज'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये धर्मेंद्र यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.

"काही वर्षांपूर्वी बॉलिवूडवर अंडरवर्ल्डचं बरंच वर्चस्व होतं. त्यामुळे अंडरवर्ल्डमधून कोणत्या कलाकाराला फोन आला की कलाकारांची घाबरगुंडी उडायची. परंतु, ज्यावेळी अंडरवर्ल्डमधून धर्मेंद्र यांना फोन आला त्यावेळी ते जराही घाबरले किंवा डगमगले नाहीत. उलट अभिनेत्याने त्यांनी तोडीस तोड असं उत्तर दिलं", असं सत्यजीत यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणतात, "अंडरवर्ल्डमधून धर्मेंद्रला फोन आल्यानंतर अभिनेत्याने त्यांना चांगलंच खडसावलं. जर तुम्ही सगळे लढायला आलात तर तुमच्याशी लढायला माझं संपूर्ण साहनेवाल येईल. तुमच्याकडे जर १० लोक असतील तर माझ्याकडे पूर्णच्या पूर्ण आर्मी आहे. एकाला जरी मी सांगितलं ना तर, पंजाबमधून लोक ट्रक भरुन भरुन येतील. त्यामुळे माझ्याशी पंगा घ्यायचा नाही, असं धर्मेंद्रने अंडरवर्ल्डला स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं."

दरम्यान,  धर्मेंद्र यांचं २४ नोव्हेंबर २०२५ रोजी निधन झालं. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अलिकडेच त्यांचा 'इक्कीस' हा अखेरचा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमात त्यांना पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले. या सिनेमात त्यांच्यासोबत अगस्त्य नंदा, जयदीप अहलावत आणि सिमर भाटिया हे कलाकार झळकले आहेत.

Web Title : धर्मेंद्र की धमकी: ही-मैन ने अंडरवर्ल्ड को दी चुनौती, बॉलीवुड की रक्षा की।

Web Summary : अपनी बहादुरी के लिए मशहूर धर्मेंद्र ने एक बार धमकी भरे कॉल मिलने के बाद निडरता से अंडरवर्ल्ड का सामना किया। उन्होंने उन्हें चेतावनी दी कि उनका पूरा गाँव उनके खिलाफ एकजुट हो जाएगा, जिससे उन्हें नुकसान पहुंचाने से रोका जा सके। उनकी बहादुरी एक किंवदंती बन गई।

Web Title : Dharmendra's Bold Threat: He-Man Confronted Underworld, Protecting Bollywood.

Web Summary : Dharmendra, known for his bravery, once fearlessly confronted the underworld after receiving threatening calls. He warned them that his entire village would rally against them, deterring them from causing harm. His boldness became a legend.