Taapsee Pannu Video: राजू श्रीवास्तव यांच्याबद्दल विचारताच तापसी पन्नू भडकली, झाली ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 13:23 IST2022-09-22T13:22:33+5:302022-09-22T13:23:50+5:30
Taapsee Pannu: अभिनेत्री तापसी पन्नू सध्या वेगळ्याच कारणांनी चर्चेत आहे. मीडियाने प्रश्न विचारण्याची देर की, तापसी एकदम भडकते. गेल्या काही आठवड्यात असे एक दोन नाही तर तीन प्रसंग घडले. ताजा प्रसंगही असाच....

Taapsee Pannu Video: राजू श्रीवास्तव यांच्याबद्दल विचारताच तापसी पन्नू भडकली, झाली ट्रोल
अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) सध्या वेगळ्याच कारणांनी चर्चेत आहे. मीडियाने प्रश्न विचारण्याची देर की, तापसी एकदम भडकते. गेल्या काही आठवड्यात असे एक दोन नाही तर तीन प्रसंग घडले. ताजा प्रसंगही असाच. पापाराझींनी घेरल्यावर आणि राजू श्रीवास्तवबद्दल विचारल्यावर तापसीचा वेगळाच अॅटिट्यूड पाहायला मिळाला. तिचं वागणं बघून चाहतेही हैराण झालेत.
सध्या तापसीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय आणि या व्हिडीओनंतर अनेकजण तापसीला ट्रोल करत आहेत. व्हिडीओत पापाराझी तापसीला राजू श्रीवास्तव यांच्या निधनावरची प्रतिक्रिया विचारतात. यावेळी काय बोलू? अरे तुम्ही आधी बाजूला व्हा. अरे भावांनो असं करू नका. थोड मागे सरका, मागे सरका...,असं म्हणत ती निघून जाते.
तापसीचा हा अॅटिट्यूड पाहून अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. अनेकांनी तिला ‘दुसरी कंगना’ म्हटलं आहे. अशा लोकांना तुम्ही का भाव देता? अशा शब्दांत काही लोकांनी राग व्यक्त केला आहे.
काहींनी मात्र तिचा बचाव केला आहे. सिक्युरिटीशिवाय ती स्वत:चा बचाव करतेय, यात तिचं कुठे चुकलं? असा सवाल करत काहींनी तिची बाजू घेतली आहे.
याआधी एका इव्हेंटमध्ये तापसीने पापाराझींना फटकारलं होतं. तापसी इव्हेंटमध्ये उशीरा पोहोचली होती. याबद्दल विचारल्यावर ती भडकली होती. यानंतर काही दिवसांआधी एका अवार्ड शोमध्ये तापसीला तिचा शाबास मिट्टू व दोबारा फ्लॉप झाल्याबद्दल प्रश्न विचारताच ती संतापल होती. प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी तिने मीडियावरच प्रश्नांचा भडीमार केला होता. चिल्लाओ मत भाई, फिर ये लोग बोलेंगे अॅक्टर्स को तमीज नहीं है, असं ती म्हणाली होती.
तापसीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, या वर्षात तिचे चार सिनेमे रिलीज झाले आणि हे चारही सिनेमे दणकून आपटले. सध्या तिच्याकडे पाच सिनेमे आहेत. जन गण मन, एलियन, ब्लर, वो लडकी है आणि डंकी अशा पाच सिनेमांत ती झळकणार आहे.