​‘स्वॅग से स्वागत’वर नोरा फतेहीचा ‘कातिलाना’ डान्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 15:50 IST2018-01-05T10:20:56+5:302018-01-05T15:50:56+5:30

‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाचे ‘स्वॅग से स्वागत’ हे गाणे सध्या प्रत्येकाच्या ओठांवर आहे. या गाण्यावर कॅटरिना कैफला थिरकताना तुम्ही पाहिले. पण आता या गाण्यावर आणखी एका सौंदर्यवतीला थिरकताना पाहण्याची संधी आम्ही तुम्हाला देणार आहोत.

'Welcome to Swag' Nora Fatehicha's 'Katilana' Dance! | ​‘स्वॅग से स्वागत’वर नोरा फतेहीचा ‘कातिलाना’ डान्स!

​‘स्वॅग से स्वागत’वर नोरा फतेहीचा ‘कातिलाना’ डान्स!

ायगर जिंदा है’ या चित्रपटाचे ‘स्वॅग से स्वागत’ हे गाणे सध्या प्रत्येकाच्या ओठांवर आहे. या गाण्यावर कॅटरिना कैफला थिरकताना तुम्ही पाहिले. पण आता या गाण्यावर आणखी एका सौंदर्यवतीला थिरकताना पाहण्याची संधी आम्ही तुम्हाला देणार आहोत. होय, ही सौदर्यवती आहे मॉडेल व अ‍ॅक्ट्रेस नोरा फतेही. ‘स्वॅग से स्वागत’च्या अरेबिक व्हर्जनवर नोराने डान्स केला आहे. तिचा हा डान्स व्हिडिओ कॅटरिनाच्या डान्सपेक्षाही पसंत केला जात आहे.तिच्या या डान्सचा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होतो आहे. नोराने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती बेली डान्स करताना दिसतेय. नोराने हा डान्स व्हिडिओ शेअर करत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.



या व्हिडिओत नोरा लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय.  नोरा फतेही याआधी सलमान खानचा रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस सीझन9’मध्ये स्पर्धक म्हणून दिसलीय. नोराच्या डान्सचे आधीच अनेक लोक दिवाने आहेत. अलीकडे नोरा पंजाबी सिंगर हार्डी संधूच्या ‘नाह’ गाण्यात दिसली होती. नोराने प्रभासच्या ‘बाहुबली’मध्येही आयटम सॉन्ग केले होते. याआधी नोरा जॉन अब्राहम स्टारर ‘रॉकी हँडसम’मधील रॉक द पार्टी या गाण्यात दिसली होती.
लवकरच नोरा फतेही ‘माय बर्थ डे सॉन्ग’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात नोरासोबत संजय सूरी दिसणार आहे. येत्या १९ तारखेला रिलीज होणारा हा चित्रपट समीर सोनी दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवतो आहे.‘माय बर्थ डे सॉन्ग’ची कथा ४० वर्षीय विवाहित व्यक्तिची कथा आहे. ही व्यक्तिरेखा संजय सूरी साकारतो आहे. आज सलमान खाने या चित्रपटाचा ट्रेलर आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला.

Web Title: 'Welcome to Swag' Nora Fatehicha's 'Katilana' Dance!