भरजरी शेरवानी ठरली डोकेदुखी, विचित्र एक्सप्रेशन्स देताना सलमान झाला कॅमे-यात कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 16:36 IST2018-08-04T16:31:35+5:302018-08-04T16:36:50+5:30
अभिनय, त्याचा डान्स, कॉमेडी आणि त्याच्या ना ना हरकती बरोबरच त्याचा शर्टलेस अंदाजावरही रसिक फिदा होतात.पिळदार बॉडी,सिक्स पॅक अॅब्ज पाहण्यासाठी सलमानचे कित्येक फॅन्स आतुर असतात.

भरजरी शेरवानी ठरली डोकेदुखी, विचित्र एक्सप्रेशन्स देताना सलमान झाला कॅमे-यात कैद
अभिनय, त्याचा डान्स, कॉमेडी आणि त्याच्या ना ना हरकती बरोबरच त्याचा शर्टलेस अंदाजावरही रसिक फिदा होतात.पिळदार बॉडी,सिक्स पॅक अॅब्ज पाहण्यासाठी सलमानचे कित्येक फॅन्स आतुर असतात. त्यामुळे सिनेमा असो किंवा टीव्ही शो एंट्री पुरतेच तो ब्लेझर घालतो मात्र काही वेळातच तो ब्लेझरलाही वैतागतो आणि थोड्याच वेळात ब्लेझर काढुन टाकतो ही वारंवार पाहायला मिळतं. त्याला जास्त ब्लेझर आणि शर्ट घालायला आवडत नाही तर आता जगजाहीर झाले आहे. अलीकडेच सलमान खानने प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या फॅशन शोमध्ये अभिनेत्री कॅटरिना कैफसोबत रॅम्प वॉक केला. यानंतर मनीष मल्होत्रा स्टेजवर आले आणि त्यांनी सर्वांचे आभार मानले एकीकडे मनीष लोकांचे आभार व्यक्त करत होते, तर दुसरीकडे सलमान मात्र भरजरी कपड्यांमुळे चांगलाच वैतागलेला होता. स्टेजवर सलमान विचित्र एक्सप्रेशन्स देताना कॅमे-यात कैद झाला. गर्मीने हैराण झालेल्या सलमानने स्टेजवरच कोट काढून टाकला.
सध्या सलमान त्याचा आगामी सिनेमा भारतच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा दक्षिण कोरिया 'ऑट टू माय फादर'वरुन प्रेरणा घेऊन तयार करण्यात येणार आहे. यात सलमानच्या अपोझिट प्रियांकाने एक्झिट घेतल्यानंतर कॅटरिनाची वर्णी लागली आहे. यात सलमानच्या बहिणीची भूमिका दिशा पटानी साकारणार आहे. सिनेमाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. भारत नावाच्या एका सामान्य व्यक्तिची कथा यात दिसेल. या सिनेमात जॅकी श्रॉफ सलमानच्या पित्याच्या भूमिकेत आहे. यापूर्वी सलमान व जॅकी ‘वीर’मध्ये एकत्र दिसले होते.