'छावा'च्या भव्यदिव्य म्यूझिक सोहळ्याचा साक्षीदार व्हायचंय? करावं लागेल फक्त हे काम, मेकर्सची प्रेक्षकांसाठी ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 17:28 IST2025-02-11T17:26:48+5:302025-02-11T17:28:00+5:30
'छावा' सिनेमाचा म्यूझिक अल्बम ए.आर.रहमान यांच्या उपस्थितीत लाँच होणार आहे. तुम्हालाही या सोहळ्याला जायचंय? बातमी वाचून जाणून घ्या

'छावा'च्या भव्यदिव्य म्यूझिक सोहळ्याचा साक्षीदार व्हायचंय? करावं लागेल फक्त हे काम, मेकर्सची प्रेक्षकांसाठी ऑफर
छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारीत 'छावा' सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. पुढील काहीच दिवसांमध्ये 'छावा' सिनेमा सर्वांच्या भेटीला येणार आहे. विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे तर अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. 'छावा' सिनेमाचं संगीत ए.आर.रहमान यांनी सांभाळलंय. ए. आर. रहमान यांच्या उपस्थितीत 'छावा'चा भव्यदिव्य म्यूझिक लाँच सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी प्रेक्षकांनाही आमंत्रण देण्यात आलंय. तुम्हालाही या संगीत सोहळ्याचा साक्षीदार व्हायचं असेल तर बातमी पूर्ण वाचा
'छावा'च्या म्यूझिक लाँच सोहळ्याला जायचं असेल तर...
'छावा'ची निर्मिती ज्यांनी केलीय त्या मॅडॉक फिल्मने त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर ही खास घोषणा केलीय. ऑस्कर विजेते भारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक-संगीतकार ए.आर.रहमान यांनी 'छावा'च्या संगीताची धुरा सांभाळली आहे. ए. आर. रहमान यांच्या उपस्थितीत 'छावा'चा भव्यदिव्य म्यूझिक लाँच सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला प्रेक्षकांना सहभागी व्हायचं असेल तर त्यांना मॅडॉक फिल्मच्या इन्स्टाग्राम पेजवरील बायोमध्ये जाऊन तिथे असणाऱ्या लिंकमधील फॉर्म भरावा लागेल. त्या फॉर्ममध्ये तुम्ही तुमचे डिटेल्स भरल्यावर स्वतःहून सिनेमाची टीम तुमच्याशी संपर्क साधून 'छावा'च्या म्यूझिक लाँचबद्दल माहिती देईल.
'छावा'निमित्त विकीची मराठी मालिकेत हजेरी
स्टार प्रवाहवरील 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत सध्या श्री आणि सौ स्पर्धेची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. ही स्पर्धा कोण जिंकणार? याची उत्सुकता असतानाच जानकी-ऋषिकेशच्या भेटीला एक खास पाहुणा आला. हा खास पाहुणा म्हणजे सुप्रसिद्ध बॉलीवुड अभिनेता विक्की कौशल. सध्या मालिकेत श्री आणि सौ स्पर्धा अटीतटीची होतेय. जानकी आणि ऋषिकेश अतिशय जिद्दीने ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जानकी-ऋषिकेशला प्रोत्साहन देण्यासाठी विक्की त्यांना खास टिप्स देताना दिसला.