'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीच्या 'छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमात 'हा' प्रसिद्ध अभिनेता साकारणार औरंगजेब
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 13:32 IST2025-11-06T13:30:59+5:302025-11-06T13:32:47+5:30
कांतारा फेम ऋषभ शेट्टीच्या आगामी सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. या सिनेमात ऋषभ शिवरायांची भूमिका साकारत आहे. तर औरंगजेबाची भूमिका बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता साकारणार आहे

'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीच्या 'छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमात 'हा' प्रसिद्ध अभिनेता साकारणार औरंगजेब
'कांतारा' फेम अभिनेता ऋषभ शेट्टीची (Rishab Shetty) मुख्य भूमिकेत असलेल्या बहुचर्चित ऐतिहासिक चित्रपट 'द प्राईड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज'मध्ये एका मोठ्या बॉलिवूड अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. या चित्रपटात शिवरायांच्या विरुद्ध असणाऱ्या मुघल शासक औरंगजेबाच्या भूमिकेत एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता झळकणार आहे. जाणून घ्या सविस्तर.
हा अभिनेता साकारणार औरंगजेबाची भूमिका
मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता विवेक ओबेरॉय 'द प्राईड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज' चित्रपटात औरंगजेबाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात ऋषभ शेट्टी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तर, अभिनेत्री शेफाली शाह राजमाता जिजाऊ यांची भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर आली आहे. आता विवेक ओबेरॉयची औरंगजेबाच्या भूमिकेतील एंट्री आणि मोठ्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील ऐतिहासिक संघर्ष पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
भव्य निर्मिती आणि रिलीज डेट
निर्माता-दिग्दर्शक संदीप सिंग 'द प्राईड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज' या चित्रपटाची धुरा सांभाळत आहेत. हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महत्त्वाकांक्षी ऐतिहासिक चित्रपट मानला जात आहे. या चित्रपटामध्ये राष्ट्रीय आणि ऑस्कर पुरस्कार विजेत्या अनेक तंत्रज्ञानांचा सहभाग असून, त्याचे चित्रीकरण सध्या सुरू आहे. हा भव्य चित्रपट २१ जानेवारी २०२७ रोजी जगभरातील ४० हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, मराठी, कन्नड, तेलुगू, तमिळ, मल्याळम, बंगाली आणि इंग्रजी अशा अनेक भाषांमध्ये रिलीज होणार आहे. त्यामुळे 'कांतारा'नंतर ऋषभला छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.