हम है राही प्यार के! विराट-अनुष्काचा सिडनीत Midnight walk, केलं नववर्षाचं स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 11:10 IST2025-01-01T11:10:08+5:302025-01-01T11:10:36+5:30
सिडनीमधील रस्त्यावर गप्पा मारत चालताना त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हम है राही प्यार के! विराट-अनुष्काचा सिडनीत Midnight walk, केलं नववर्षाचं स्वागत
विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हे लोकप्रिय कपल सध्या ऑस्ट्रेलियात आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट मॅच सुरु आहेत. अनुष्काही विराटला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियमवर असते. मॅचनंतर कोहली कुटुंबासोबतच वेळ घालवताना दिसतो. विराट-अनुष्काने सिडनीमध्ये मिडनाईट वॉक करत नवीन वर्षाचं स्वागत केलं. सिडनीमधील रस्त्यावर गप्पा मारत चालताना त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथा कसोटी सामना मेलबर्न येथे झाला. तर आता पाचवा कसोटी सामना खेळाडू सिडनीला रवाना झाले आहेत. मंगळवारी रात्री सर्वांनी नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं. भारताआधी ऑस्ट्रेलियात न्यू इयर सेलिब्रेट झाला. सिडनीमध्ये विराट अनुष्का मध्यरात्री वॉक करताना दिसले. ब्लॅक आऊटफिटमध्ये दोघंही ट्विनींग करताना दिसले. यावेळी त्यांच्यासोबत क्रिकेटपटू देवदत्त पड्डीकलही दिसला. त्यांचा हा व्हिडिओ ट्विटरवर जोरदार व्हायरल होतोय.
Virat Kohli and Anushka Sharma spotted on the streets of Sydney for a New Year Party 🎊♥️💫🎇 pic.twitter.com/6XKWOWHgPk
— Deeparam Yadav (@DrYadav5197) January 1, 2025
विराट अनुष्का कुठेही असोत चाहत्यांना त्यांचे अपडेट बघायचे असतात. आधी लंडन तर आता ऑस्ट्रेलियातील त्यांचे व्हिडिओ समोर येत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत वामिका आणि अकाय मात्र दिसले नाहीत. दुसरीकडे चालू कसोटी सामन्यात भारताने निराशाजनक कामगिरी केली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचा रस्ता आणखी अवघड आहे. भारताला सिडनी कसोटी सामना जिंकावा लागेल नाहीतर भारत बाहेर होईल.