नीतू कपूरच्या डान्सपुढे नोरा फतेहीदेखील पडली फिकी; video पाहून तुम्ही म्हणाल, क्या बात!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 18:23 IST2022-04-03T18:22:57+5:302022-04-03T18:23:57+5:30
Neetu kapoor: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या नीतू कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

नीतू कपूरच्या डान्सपुढे नोरा फतेहीदेखील पडली फिकी; video पाहून तुम्ही म्हणाल, क्या बात!!
बॉलिवूडमध्ये ८० ते ९० चा काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे नीतू कपूर. उत्तम अभिनयशैली, सौंदर्य आणि नृत्यकौशल्य यांच्या जोरावर नीतू कपूर यांनी प्रत्येक प्रेक्षकाच्या मनावर राज्य केलं. विशेष म्हणजे आता नीतू कपूर (Neetu Kapoor) यांचा पूर्वीपेक्षा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, त्यांची क्रेझ अद्यापही कमी झालेली नाही. त्यामुळे त्या कायम सोशल मीडियावर चर्चेत येत असतात. यामध्येच सध्या त्यांचा एक डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी डान्स क्वीन नोरा फतेहीवरदेखील मात केली आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या नीतू कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नीतू कपूर प्रसिद्ध डान्सर नोरा फतेही हिच्यासोबत 'नाच मेरी रानी' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांचा डान्स पाहिल्यावर वय हा केवळ आकडा आहे, असं दिसून येतं.
'माझ्या आवडीच्या लोकांसह डान्स दीवाने ज्युनिअरच्या मंचावर खूप मज्जा केली.#dancewithnora असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. दरम्यान, सध्या नीतू कपूर या डान्स दीवाने ज्युनिअर्सच्या मंचावर परिक्षक पदाची जबाबदारी पार पाडत आहेत. या शोमध्ये त्यांच्यासह नोरा फतेही आणि मर्झी पेस्टनजी देखील आहेत.