शुन्यातून घडवलेलं विश्व, शिपायाचं काम अन् तिची साथ,'या' राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमाची झाली जगभर चर्चा, कुठे बघाल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 13:51 IST2026-01-08T13:47:30+5:302026-01-08T13:51:46+5:30
राष्ट्रीय पुरस्कारावर कोरलं नाव! झिरो ते हिरो बनण्याचा 'हा' प्रवास डोळ्यात आणेल पाणी,८.७ रेटिंग असलेला सिनेमा पाहिलात का?

शुन्यातून घडवलेलं विश्व, शिपायाचं काम अन् तिची साथ,'या' राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमाची झाली जगभर चर्चा, कुठे बघाल?
Bollywood Cinema: सध्या थिएटर्स आणि ओटीटीवर दोन्हीकडे बरेच चित्रपट रिलीज होत असतात. या चित्रपटांना ओटीटीवर सुद्धा तितकाच चांगला प्रतिसाद मिळतो.डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज होताच अनेक चित्रपट टॉप ट्रेंडिंग सिनेमाच्या यादीत येतात. आज आपण अशाच एका चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याला आयएमडीबीवर खूप चांगले रेटिंग मिळाले होते. तसंच या चित्रपटाने थिएटसह ओटीटीवरही आपला दबदबा निर्माण केला. हा चित्रपट कोणता शिवाय तो कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहाता येईल, याबद्दल जाणून घेऊयात...
राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरलेल्या या सिनेमाचं नाव '12th फेल'आहे. अभिनेता विक्रांत मेस्सी आणि मेधा शंकर यांची चित्रपटात मुख्य भूमिका आहे. सत्य घटनेवर आधारित'12th फेल' हा चित्रपट २७ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रदर्शित झाला. अवघ्या २० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ६६.५८ कोटींचा गल्ला जमवला. आयपीएस अधिकारी मनोज शर्मा आणि श्रद्धा जोशी या जोडप्याची प्रेरणादायी कहाणी या चित्रपटातून मांडण्यात आली.
विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित '12th fail'या चित्रपट म्हणजे आयपीएस मनोज शर्मा यांच्या संघर्षाची, जिद्दीची, प्रामाणिकपणाची, चिकाटीची, स्वाभिमानाची आणि अपार कष्टांची कथा आहे.जिथे हुषार मुलांची डाळ शिजत नाही, तिथे १२ वी नापास तरुण आयपीएस बनून कुटुंबासह गावाचं नाव उज्ज्वल करतो. मध्य प्रदेशातील मुरैना सुरु झालेला मनोज यांचा दिल्ली पर्यंत पोहोचण्याचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. यादरम्यान, मनोज कुमार शर्मा यांनी सुरुवातीच्या दिवसांत वाचनालयात शिपायाचं काम करणं. तसेच श्रद्धा जोशी यांची मिळालेली साथ ही कहाणी प्रेक्षकांना खिळवून ठेवते.
'12th fail'हा सिनेमा अनुराग पाठक यांच्या या पुस्तकावर आधारलेला आहे. हा बहुचर्चित सिनेमा नेटफ्लिक्स आणि जिओ हॉटस्टारवर उपलब्ध आहे.