Vikram : कमल हासन यांनी सूर्याला गिफ्ट केलं स्वत:चं ‘रोलेक्स’ घड्याळ, किंमत वाचून थक्क व्हाल!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 10:30 IST2022-06-09T10:21:07+5:302022-06-09T10:30:23+5:30

Kamal Haasan Gifts to Suriya: ‘रोलेक्स’ला ‘रोलेक्स’...! ‘विक्रम’मध्ये सूर्यानं ड्रग्स माफिया असणाऱ्या रोलेक्स नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे.

Vikram movie Kamal Haasan Gifts Suriya Rolex watch worth 47 lakh | Vikram : कमल हासन यांनी सूर्याला गिफ्ट केलं स्वत:चं ‘रोलेक्स’ घड्याळ, किंमत वाचून थक्क व्हाल!!

Vikram : कमल हासन यांनी सूर्याला गिफ्ट केलं स्वत:चं ‘रोलेक्स’ घड्याळ, किंमत वाचून थक्क व्हाल!!

Kamal Haasan Gifts to Suriya: साऊथचे मेगास्टार कमल हासन (Kamal Haasan) यांचा ‘विक्रम’ (Vikram) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. रिलीजनंतर पाचच दिवसांत या चित्रपटानं वर्ल्डवाईड 200 कोटींची कमाई केली आहे. साहजिकच कमल हासन जाम खुश्श आहेत. इतके की, परवाच त्यांनी ‘विक्रम’चे दिग्दर्शक लोकेश कनगराज यांना कोट्यवधी रूपयांची अलिशान कार भेट दिली होती.  ‘विक्रम’च्या अन्य 13 सहाय्यक दिग्दर्शकांनाही त्यांनी लाख रूपये किमतीची बाईक्स गिफ्ट म्हणून दिली. आता त्यांनी ‘विक्रम’मध्ये कॅमिओ रोल करणारा सुपरस्टार सूर्याला (Suriya) एक खास भेट दिली.

‘विक्रम’मध्ये सूर्यानं ड्रग्स माफिया असणाऱ्या रोलेक्स नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. चित्रपटात सूर्याचा फक्त 10 मिनिटांचा रोल आहे. पण त्याच्या या 10 मिनिटांच्या रोलनं प्रेक्षकांना अक्षरश: क्रेझी केलं आहे. विशेष म्हणजे, या भूमिकेसाठी सूर्यानं एक रूपयाही घेतला नाही. आता याची भरपाई कुठल्या का पद्धतीने असेना, व्हायला हवीच. बुधवारी कमल हासन यांनी मोठ्या प्रेमानं सूर्याला स्वत:चं ‘रोलेक्स’ हे घड्याळ भेट दिलं.  भूमिकेच्या नावाप्रमाणेच ‘रोलेक्स’ हे घड्याळ गिफ्ट मिळाल्यावर सूर्याला सुद्धा गहिवरून आलं. या घड्याळाची किंमत 47 लाख रूपये असल्याचे कळतं.

मंगळवारी कमल हासन यांनी एक व्हिडीओ शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले होते. या व्हिडीओत त्यांनी सूर्याचे विशेष आभार मानले होते. ‘विक्रम’च्या सीक्वलमध्ये सूर्याला आणखी मोठा रोल मिळेल, याची मी काळजी घेईल, असं ते म्हणाले होते.

सूर्यानं मानले आभार 

सूर्यानं ट्विटरवर पोस्ट शेअर करुन कमल हासन यांचे इतकी सुंदर भेटवस्तू दिल्याबद्दल आभार मानले.  ‘असे क्षण आयुष्य सुंदर करतात. तुमच्या रोलेक्ससाठी खूप खूप आभार अन्ना,’ असं त्याने लिहिलं.  सूर्यानं शेअर केलेल्या फोटोमध्ये कमल हसन हे सूर्याला घड्याळ घालताना दिसत आहेत. 


  
‘विक्रम’ हा चित्रपट हिंदी, तेलगू आणि मल्याळम या भाषामध्ये प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. ‘विक्रम’ हा सिनेमा 3 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात कमल हासन व्यतिरिक्त विजय सेतुपती, शिवानी नारायण, फहाद फासिल मुख्य भूमिकेत दिसत आहेत.

Web Title: Vikram movie Kamal Haasan Gifts Suriya Rolex watch worth 47 lakh