राम चरणने आपल्या दिलदारपणाने जिंकलं फॅन्सचं मन, माकडासोबतचा अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 17:39 IST2022-04-16T17:36:56+5:302022-04-16T17:39:06+5:30
Ram Charan : हनुमान जयंती (Hanuman Jayanti 2022) ला शेअर केलेल्या या व्हिडीओत राम चरण एका माकडासोबत दिसत आहे. राम चरण मेकअप करत असताना हे माकड थेट रूममध्ये आलं होतं.

राम चरणने आपल्या दिलदारपणाने जिंकलं फॅन्सचं मन, माकडासोबतचा अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल
साऊथ इंडियन सुपरस्टार राम चरण (Ram Charan) काही दिवसांपासून ब्रम्हचर्याच्या लूकमध्ये दिसत आहे. काळे कपडे, एक दुपट्टा आणि चप्पल न घातला तो फिरतो. त्याच्या या साध्या लूकमुळे कोट्यावधी फॅन्सच्या मनात त्याने जागा केली आहे. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशात त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने हनुमान जयंतीच्या शुभेच्छ दिल्या आहेत.
हनुमान जयंती (Hanuman Jayanti 2022) ला शेअर केलेल्या या व्हिडीओत राम चरण एका माकडासोबत दिसत आहे. राम चरण मेकअप करत असताना हे माकड थेट रूममध्ये आलं होतं. हनुमानाचा अवतार मानलं जाणारं माकड राम चरणच्या सोफ्यावर येऊन बसतं. तेव्हा राम चरण त्याला बिस्कीट देतो. हे करून राम चरणने फॅन्स मन जिंकलं आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राउंडला हनुमान चालीसा सुरू आहे.
हा रील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत चरणचे वडील अभिनेते चिरंजीवी यांनी हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. फॅन्सना हा व्हिडीओ फारच आवडला आहे. राम चरण केवळ अभिनयामुळेच नाही तर त्याच्या चांगल्या स्वभावासाठीही ओळखला जातो.
दरम्यान RRR च्या शूटींगवेळी यूक्रेनमध्ये त्याचा बॉडीगार्ड म्हणून काम करणाऱ्या रस्टी नावाच्या व्यक्तीची आर्थिक मदत केली होती. इतकंच नाही तर त्याच्या पत्नीसोबत फोनवर बोलणंही केलं होतं. नंतर रस्टीने एक व्हिडीओ जारी करून राम चरणचे आभार मानले होते.
वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर राम चरण सध्या त्याच्या आगामी 'आचार्य' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या सिनेमात तो त्याचे वडील चिरंजीवी यांच्यासोबत दिसणार आहे. तेच RRR हा सिनेमा अजूनही बॉक्स ऑफिसवर आहे. या सिनेमाने कमाईचे अनेक रेकॉर्ड्स तोडले आहेत.