Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 10:53 IST2025-10-31T10:53:25+5:302025-10-31T10:53:56+5:30
Rakhi Sawant And Salman Khan : अभिनेत्री राखी सावंत दुबईहून परतल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने आता असं काही म्हटलं आहे जे ऐकल्यावर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
'ड्रामा क्वीन' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत दुबईहून परतल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने आता असं काही म्हटलं आहे जे ऐकल्यावर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमान खानसाठी सोन्याची अंगठी घेतली" असा धक्कादायक दावा अभिनेत्रीने केला आहे. यासोबतच तिने 'बिग बॉस 19' कंटेस्टेंट तान्या मित्तललाही टोला लगावला आहे.
राखी सावंत एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. तेव्हा तिने दावा केला की, आपल्या दोन्ही किडन्या विकून तिने हे सर्व सामान खरेदी केलं आहे. तिने अभिनेता सलमान खानसाठी देखील सोन्याची अंगठी घेतली. तिचा हा व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत असून सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
"डोनाल्ड ट्रम्प माझे खरे वडील, मी तान्या मित्तलपेक्षा श्रीमंत..."; राखी सावंतचा मोठा दावा
"मी सोन्याची पर्स घेतली आणि तुम्ही पाहिलं की, मी सलमान भाईसाठी एवढी मोठी सोन्याची अंगठी घेतली आहे. मी माझ्या दोन्ही किडन्या विकल्या आहेत. माझ्या दोन्ही किडन्या विकूनच मी हे सर्वकाही घेतलं आहे. सलमान भाईसाठी किडनी काय, मी काहीही विकू शकते" असं राखीने म्हटलं आहे.
राखी सलमानला भाऊ मानते. अभिनेत्याने तिला तिच्या कठीण काळात खूप मदत केली होती. राखीचं सलमानवर असलेलं प्रेम लपून राहिलेलं नाही. जेव्हा केव्हा संधी मिळते तेव्हा ती ते व्यक्त करत असते. त्याच्यासाठी स्टँड घेत असते. सलमानला कोणी काही बोललं तर राखी चोख प्रत्युत्तर देते. राखीने तान्या मित्तलला खोचक टोला लगावला आहे. "मी इतकी श्रीमंत आहे की, मी दुबईला जाऊन माझे केस कलर करून घेतले" असं म्हटलं आहे.
