मुसळधार पावसात विकी कौशलचा भन्नाट डान्स; Video पोस्ट करत म्हणाला, दहीहंडी, पाऊस…'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 15:24 IST2023-09-08T15:23:28+5:302023-09-08T15:24:37+5:30
विकी कौशलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलायं. यात तो मुसळधार पावसात भन्नाट डान्स करताना पाहायला मिळत आहे.

Vicky Kaushal
बॉलिवूडचा हँडसम अभिनेता विकी कौशल आगामी 'द ग्रेट इंडियन फॅमिली' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाचं पहिलं गाणं 'कन्हैय्या ट्विटर पे आजा' नुकतंच रिलीज झालं आहे. यातच तरुणींच्या गळ्यातला ताईत असलेल्या विकी कौशलने मुंबईत दहीहंडी उत्साहात साजरी केलीय.
विकी कौशलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलायं. व्हिडीओला दिलेल्या क्पशनमध्ये त्यानं लिहलं की, "दहीहंडी… पाऊस… आणि माझ्या 'द ग्रेट इंडियन फॅमिली'चं प्रेम! जन्माष्टमी एकदम भारी झाली. 22 सप्टेंबरला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात भेटुया". व्हिडीओत तो पारंपारिक लूकमध्ये दिसला. त्याने पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा घातला होता.
विकी कौशलने मुसळधार पावसातही 'द ग्रेट इंडियन फॅमिली' चित्रपटातील 'कन्हैया ट्विटर पे आजा' या गाण्यावर भन्नाट डान्स केला. पाऊस सुरू असतानाही तो कमालीचा उत्साही दिसून आला आहे.
'द ग्रेट इंडियन फॅमिली' सिनेमा २२ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यामध्ये मानुषी छिल्लर विकी कौशलसोबत झळकणार आहे. विजय कृष्ण आचार्य यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 'जरा हटके जरा बचके' हा सिनेमा सुपरहिट झाल्यानंतर विकीच्या या आगामी सिनेमाकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.