या खास दिवशी येणार 'छावा' सिनेमाचा बहुचर्चित ट्रेलर? विकी कौशलच्या चाहत्यांना उत्सुकता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 15:55 IST2024-12-30T15:54:21+5:302024-12-30T15:55:46+5:30
विकी कौशलच्या आगामी 'छावा' सिनेमाची सर्वांंना उत्सुकता असून सिनेमाच्या ट्रेलरबाबत महत्वाची अपडेट समोर आलीय (chhava, vicky kaushal)

या खास दिवशी येणार 'छावा' सिनेमाचा बहुचर्चित ट्रेलर? विकी कौशलच्या चाहत्यांना उत्सुकता
'छावा' सिनेमाची सध्या चांगलीच उत्सुकता आहे. या सिनेमात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. 'छावा' सिनेमाचा टीझर काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेला. तेव्हापासून सिनेमाच्या ट्रेलरची उत्सुकता होती. 'छावा' सिनेमा ६ डिसेंबर २०२४ ला रिलीज होणार होता. परंतु पुष्पा २ मुळे 'छावा'ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता 'छावा'ची वाट पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांना आनंदाची बातमी. 'छावा'चा बहुचर्चित ट्रेलर या खास दिवशी रिलीज होणार आहे.
'छावा'चा ट्रेलर या तारखेला होणार रिलीज?
'छावा'चा बहुचर्चित ट्रेलर १६ जानेवारी २०२५ ला रिलीज होणार आहे. यामागचं निमित्त म्हणजे, १६ जानेवारीला छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आहे. त्यानिमित्ताने 'छावा'चा ट्रेलर रिलीज होण्याची शक्यता आहे. या दिवशी ट्रेलर आणि सिनेमाची ऑफिशिअल रिलीज डेट जाहीर होईल. अजूनतरी याविषयी अधिकृत घोषणा झाली नसली तरीही १६ जानेवारीला संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त 'छावा'बद्दल मोठी अपडेट जाहीर होईल.
'छावा' कधी रिलीज होणार?
'छावा' सिनेमा १४ फेब्रुवारी २०२५ ला रिलीज होणार आहे. १४ फेब्रुवारी हा दिवस निवडण्यामागे निर्मात्यांनी खास शक्कल लढवली आहे. ती म्हणजे 'छावा' सिनेमाच्या रिलीजनंतर काहीच दिवसांनी म्हणजेच १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. या खास दिनाचं औचित्य साधून निर्मात्यांनी 'छावा' सिनेमा १४ फेब्रुवारीला रिलीज करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे सिनेमाला नक्कीच याचा फायदा होईल.