Happy Birthday Vicky Kaushal : विकी कौशलला वाटते पाण्याची भीती, 'भूत' च्या शूटिंगवेळी आला धक्कादायक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 10:40 IST2023-05-16T10:39:46+5:302023-05-16T10:40:39+5:30

विकी कौशल 35 वा वाढदिवस साजरा करत आहे.

vicky kaushal turns 35 today he is scared of water shared experience while shooting for bhoot | Happy Birthday Vicky Kaushal : विकी कौशलला वाटते पाण्याची भीती, 'भूत' च्या शूटिंगवेळी आला धक्कादायक अनुभव

Happy Birthday Vicky Kaushal : विकी कौशलला वाटते पाण्याची भीती, 'भूत' च्या शूटिंगवेळी आला धक्कादायक अनुभव

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) सध्याचा आघाडीचा अभिनेता. 'उरी' सिनेमाच्या यशानंतर विकीने मागे वळून बघितलं नाही. तो जितक्या सहजतेने अभिनय करतो तितकाच खऱ्या आयुष्यातही तो साधा असल्याचं वेळोवेळी त्याच्या मुलाखतींमधून दिसतं. आज विकी कौशल 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने विकीबद्दल जाणून घेऊया एक इंटरेस्टिंग गोष्ट

विकीला पाण्याची वाटते भीती 

विकी कौशलला हायड्रोफोबिया आहे. त्याला पाण्याची प्रचंड भीती वाटते. याचा अनुभव त्याला 'भूत' आणि 'मॅन व्हर्सेस वाईल्ड' सिनेमाचं शूट करताना आला. 'भूत' सिनेमाच्या चित्रीकरणावेळी अनेक सीन्स हे पाण्यात शूट करायचे होते. विकी ३ सेकंदांच्यावर पाण्यात राहूच शकत नव्हता.कितीही प्रयत्न केले तरी त्याला अंडरवॉटर शॉट देता येत नव्हते. शेवटी मेकर्सने यावर उपाय म्हणून त्याला काही वेळ पाण्यात थांबू दिले जेणेकरुन त्याला सवय होईल. तो कंफर्टेबल झाल्यावर सीन शूट करण्यात आला.

मध्यंतरी विकी 'मॅन व्हर्सेस वाईल्ड' शोमध्येही सहभागी झाला होता. यावेळी काही केल्या त्याला समुद्रात डाईव्ह मारायला जमलं नाही. पाण्याची प्रचंड भीती वाटत असल्याचं त्याने तेव्हाही सांगितलं.सध्या विकी 'जरा हटके जरा बचके' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पहिल्यांदाच त्याची आणि सारा अली खानची जोडी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. 

Web Title: vicky kaushal turns 35 today he is scared of water shared experience while shooting for bhoot