आता टीव्हीवर घरबसल्या बघा 'बॅड न्यूज!' विकी कौशल-तृप्ती डिमरीचा सिनेमा 'या' ओटीटीवर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 15:13 IST2024-08-30T15:12:42+5:302024-08-30T15:13:21+5:30
'बॅड न्यूज' सिनेमा या ओटीटीवर रिलीज झाला असून आता तुम्हाला घरबसल्या सिनेमा बघता येणार आहे (bad newz)

आता टीव्हीवर घरबसल्या बघा 'बॅड न्यूज!' विकी कौशल-तृप्ती डिमरीचा सिनेमा 'या' ओटीटीवर रिलीज
विकी कौशल - तृप्ती डिमरी यांची प्रमुख भूमिका असलेला 'बॅड न्यूज' सिनेमा लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही १०० पेक्षा जास्त कोटींचा व्यवसाय केलाय. विकी कौशल-तृप्ती डिमरी-अॅमी वर्क या कलाकारांनी साकारलेल्या भूमिका लोकांना आवडला. सिनेमाची वेगळी कथा, गाणी अशा सर्वच गोष्टींची चर्चा झाली. विकी-तृप्तीचा हाच 'बॅड न्यूज' सिनेमा आता ओटीटीवर रिलीज झालाय.
या ओटीटीवर बघू शकता 'बॅड न्यूज'?
विकी कौशल-तृप्ती डिमरीचा 'बॅड न्यूज' सिनेमा आता ओटीटी रिलीजसाठी सज्ज झालाय. 'बॅड न्यूज' प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. हा सिनेमा सध्यातरी तुम्हाला फ्रीमध्ये पाहता येणार नाही. सिनेमा पाहण्यासाठी तुमच्याकडे अमेझॉन प्राईमचं सबस्क्रिप्शन सोबतच ३४९ रुपये मोजावे लागणार आहेत. सध्या तरी हा सिनेमा फ्रीमध्ये नसला तरी लवकरच सिनेमा प्राइम व्हिडीओवर फ्रीमध्ये बघता येईल.
Hindi film #BadNewz is now available on rent on Amazon Prime Video Store. pic.twitter.com/z6nJPzvDmT
— Streaming Updates (@OTTSandeep) August 29, 2024
'बॅड न्यूज' सिनेमाविषयी
'बॅड न्यूज' २ तास २२ मिनिटांचा असून सिनेमाला U/A सर्टिफिकेट मिळालेलं आहे. नेहा धुपियादेखील सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या सिनेमातील विकी-तृप्तीची केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. 'बॅड न्यूज' सिनेमातलं 'तौबा तौबा' (Tauba Tauba) हे गाणं चांगलंच व्हायरल झालं. विकीच्या डान्स स्टेप्सने लोकांना वेड लावलं आहे. या गाण्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ठेका धरायला लावलाय. आता ओटीटीवर रिलीज झाल्याने या सिनेमाचा घरबसल्या आनंद घेता येणार आहे.