फोटोत छोट्या भावासोबत बसलेल्या हा चिमुकला आज आहे सुपरस्टार, त्याचा भाऊ ही आहे स्टार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 20:09 IST2023-05-19T20:06:29+5:302023-05-19T20:09:57+5:30
बॉलिवूड स्टार्सचे चाहते त्यांच्या आवडत्या स्टार्सच्या प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवून असतात.

फोटोत छोट्या भावासोबत बसलेल्या हा चिमुकला आज आहे सुपरस्टार, त्याचा भाऊ ही आहे स्टार
सध्याच्या काळात अनेक सेलिब्रिटी चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. त्यामुळे ही सेलिब्रिटी मंडळी अनेकदा त्यांच्या जीवनातील लहानसहान गोष्टीही चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यामध्येच मध्यंतरी अनेक कलाकार मंडळींनी त्यांच्या बालपणीचे किंवा कॉलेज जीवनातील फोटो शेअर करत नवा ट्रेंड सुरु केला होता. यामध्येच आता एका लोकप्रिय अभिनेत्याचा फोटो चर्चेत येत आहे.
बॉलिवूड स्टार्सचे चाहते त्यांच्या आवडत्या स्टार्सच्या प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवून असतात. आता कलाकारांचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंवरून चाहत्यांनाही अंदाज येतो की हा स्टार कोण आहे. मात्र यावेळी जे फोटो समोर आले आहेत, त्यामुळे या अभिनेत्याची ओळखं थोडे कठीण जातंय.
भावासोबत फोटोमध्ये बसलेल्या या चिमुकल्याला फोटो पाहून तुम्हाला ओळखता येत नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोटो इतर कोणाचा नसून हँडसम हंक विकी कौशल आहे. त्याच्या शेजारी बसलेला हा मुलगा सनी कौशल आहे.
विकी कौशल सध्या त्याच्या आगामी 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ज्यामध्ये त्याच्यासोबत सारा अली खान दिसणार आहे. 2019 मध्ये आलेल्या उरीनंतर एकही चित्रपट हिट झालेला नाही. त्याचा भूत भाग एक - द हॉन्टेड शिप, सरदार उधम, गोविंद नाम मेरा फ्लॉप झाले. बऱ्याच दिवसांनी सारा आणि विकीचा चित्रपट पडद्यावर प्रदर्शित होत आहे. त्यामुळे दोघांच्या आगामी चित्रपटाकडून चाहत्यांना खूप आशा आहेत.