पंडितांच्या घरात मुसलमान मुलगा? विकी कौशलच्या 'द ग्रेट इंडियन फॅमिली' चा मजेशीर ट्रेलर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 16:11 IST2023-09-12T16:08:43+5:302023-09-12T16:11:21+5:30
भजन कुमार चक्क मुसलमान आहे. हे नेमकं काय प्रकरण आहे ते २२ सप्टेंबरलाच कळेल.

पंडितांच्या घरात मुसलमान मुलगा? विकी कौशलच्या 'द ग्रेट इंडियन फॅमिली' चा मजेशीर ट्रेलर रिलीज
विकी कौशलच्या (Vicky Kaushal) चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे. 'जरा हटके जरा बचके' नंतर विकीचा आगामी 'द ग्रेट इंडियन फॅमिली' (The Great Indian Family) सिनेमा रिलीज होत आहे.याचा ट्रेलर आज प्रदर्शित झालाय. फक्त ट्रेलर पाहूनच चाहत्यांची हसून हसून पुरेवाट झाली आहे. विकी यामध्ये 'भजन कुमार' ही भूमिका साकारत आहे. पण हा भजन कुमार चक्क मुसलमान आहे. हे नेमकं काय प्रकरण आहे ते २२ सप्टेंबरलाच कळेल.
भजन कुमार उर्फ वेद व्यास त्रिपाठी या व्यक्तीची ही गोष्ट आहे. तो मुलींना प्रभावित करायला जातो पण मुली त्याला पूजनीय समजून त्याचे आशीर्वाद घेऊन निघून जातात. पण तरी तो प्रेमाच्या शोधत असतो. तेव्हा एंट्री होते मॉडर्न मुलगी मानुषी छिल्लरची.सिनेमाची खरी मजा यांच्या प्रेमकहाणीत नाही तर ब्राह्मणांच्या घरी जन्मलेल्या भजन कुमारच्या आयुष्यात एक वेगळाच ट्वीस्ट येतो जेव्हा त्याला कळतं की तो ब्राह्मण नसून मुसलमान आहे. इथूनच त्याच्या आयुष्यात उलथापालथ सुरु होते. ट्रेलरमधून सध्या हेच चित्र दिसतंय. सिनेमाची गोष्ट नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे.
ट्रेलर केवळ १ मिनिट ५५ सेकंदांचा आहे. सिनेमातील 'कन्हैय्या ट्विटर रे आजा' हे गाणं चांगलंच चर्चेत आहे. प्रीतमने सिनेमात म्युझिक दिलं असून सिनेमा यशराज बॅनर्सखाली बनवण्यात आला आहे. विजय कृष्ण आचार्य यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. २२ सप्टेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित होतोय. हा फॅमिली ड्रामा बघायला चाहते खूपच उत्सुक आहेत.