विकी कौशलने केलं कतरिनाचं कौतुक; म्हणाला- 'तिच्यासारखी जोडीदार मिळणं हा आशीर्वाद...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 12:21 IST2023-11-24T12:20:32+5:302023-11-24T12:21:00+5:30

नुकत्याच एका मुलाखतीत विकीने लाडक्या बायकोचं तोंडभरुन कौतुक केले आहे. 

Vicky Kaushal praised Katrina; Said - 'It's a blessing to have a partner like her...' | विकी कौशलने केलं कतरिनाचं कौतुक; म्हणाला- 'तिच्यासारखी जोडीदार मिळणं हा आशीर्वाद...'

नुकत्याच एका मुलाखतीत विकीने लाडक्या बायकोचं तोंडभरुन कौतुक केले आहे. 

अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांची जोडी बॉलीवूडमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. दोघांनीही बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत आणि सतत काम करत आहेत. शिवाय, दोघेही एकमेंकावरचं प्रेम व्यक्त करण्याचा कुठलही संधी सोडत नाहीत. नुकत्याच एका मुलाखतीत विकीने लाडक्या बायकोचं तोंडभरुन कौतुक केले आहे. 


पिंकविलाशी बोलताना विकी म्हणाला, 'कतरिना ही एक सुंदर व्यक्ती आहे. शब्दात  सांगू शकणार नाही. परंतु तिच्यासोबत जीवन जगण्यात एक मजा आहे.  कतरिना माझ्या आयुष्यात आल्यापासून सर्व काही बदलले आहे. असा जोडीदार शोधणे खरोखरच एक आशीर्वाद आहे'. 

कतरिनासोबत स्क्रिप्ट्स आणि इतर कामाशी संबंधित गोष्टींवर चर्चा करतो का? यावर अभिनेत्याने उत्तर दिले, 'नाही, आमच्या जास्त कामाची चर्चा होत नाही. पण, स्क्रिप्ट, चित्रपट हे निःसंशयपणे आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आम्ही दोघे एकाच प्रोफेशनचे आहोत'.

विकी आणि कतरिनाचे ९ डिसेंबर रोजी राजस्थानमध्ये लग्न झाले. दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, कतरिना कैफ अलीकडेच सलमान खान स्टारर 'टायगर 3' मध्ये दिसली. यानंतर ती लवकरच विजय सेतुपतीसोबत 'मेरी ख्रिसमस'मध्ये दिसणार आहे. तर विकी कौशल मेघना गुलजारच्या 'सॅम बहादूर' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा सिनेमा1 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. 
 

Web Title: Vicky Kaushal praised Katrina; Said - 'It's a blessing to have a partner like her...'