विकी-कतरिनाचं लग्न अन् व्हायरल होतोय चहावाल्याचा फोटो, आहे एक वेगळंच कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 18:40 IST2021-12-10T18:26:45+5:302021-12-10T18:40:19+5:30
Vicky kaushal katrina kaif wedding : आता विकी व कतरिनाच्या लग्नात चहावाल्याचा काय ‘रोल’ असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर आहे.

विकी-कतरिनाचं लग्न अन् व्हायरल होतोय चहावाल्याचा फोटो, आहे एक वेगळंच कनेक्शन
विकी कौशल (Vicky kaushal) आणि कतरिना कैफ (katrina kaif ) काल (9 डिसेंबर) पती-पत्नी झालेत. दीर्घकाळापासून दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. अखेर ती खरी ठरली. कतरिना बॉलिवूडची बडी अभिनेत्री आणि विकी प्रेक्षकांचा आवडता अभिनेता. अशात या लग्नाची प्रचंड चर्चा झाली. सोशल मीडियावर तर एकच कल्ला झाला. कतरिना व विकीच्या लग्नावरचे एकापेक्षा एक भन्नाट मीम्स आणि जोक्सही व्हायरल झालेत. इतकंच नाही तर एका चहावाल्याचा फोटोही तुफान व्हायरल झाला.
आता विकी व कतरिनाच्या लग्नात चहावाल्याचा काय ‘रोल’ असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर आहे. होय, विकी व कतरिनाच्या लग्नाशी नसला तरी सलमान व कतरिनाशी नक्कीच आहे.
सोशल मीडियावर वा-याच्या वेगाने व्हायरल होत असलेल्या या फोटोत एक चहावाला त्याच्या टपरीवर उभा राहून चहा बनवताना दिसतोय. त्याच्या चहाच्या स्टॉलचं नाव आहे सुधीर चायवाला आणि या स्टॉलवर एक बोर्ड आहे, तेच खास आहे.
‘सलमानने कहा कटरिना के कान में, चलो चाय पीते हैं सुधीर की दुकान में’, अशी ओळ त्यावर आहे. याचमुळे हा फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. साहजिकच, या फोटोच्या निमित्ताने नेटकरी भाईजानची मजा सुद्धा घेत आहेत.
‘हिंदुस्थान’ पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार,या व्हायरल फोटोतील चहा स्टॉल हा बिहारच्या पाटणातील आहे. कुंवर सिंह चौकात हा टी स्टॉल आहे. हा फोटो यावर्षी ऑगस्टमध्ये सुद्धा व्हायरल झाला होता. त्यावेळी कतरिना आणि विकीच्या लग्नाची चर्चा नव्हती. पण सलमान आणि कतरिनाचा संबंध जोडत हा फोटो लोकांनी व्हायरल केला होता.
एकेकाळी सलमान व कतरिना रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. अर्थात सलमान वा कॅटने कधीच या चर्चांना दुजोरा दिला नाही. कालांतराने कतरिनाच्या आयुष्यात रणबीर कपूर आला आणि यामुळे म्हणे सलमान कॅटपासून दूर गेला.