विकी-कतरिनाच्या मुलाच्या नावाचं 'उरी' कनेक्शन आलं समोर; वाचून तुम्हीही थक्क व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 10:48 IST2026-01-08T10:38:33+5:302026-01-08T10:48:21+5:30
Katrina-Vicky Kaushal Son Name: विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या मुलाचं उरी सिनेमाशी खास कनेक्शन चाहत्यांनी लावलं आहे. वाचून तुम्हीही अचंबित व्हाल

विकी-कतरिनाच्या मुलाच्या नावाचं 'उरी' कनेक्शन आलं समोर; वाचून तुम्हीही थक्क व्हाल
Katrina-Vicky Kaushal Baby Name: बॉलिवूडचे लोकप्रिय जोडपे कतरिना कैफ आणि विकी कौशल हे काही दिवसांपूर्वीच आई-बाबा झाले. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी कतरिनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. आता मुलाच्या जन्मानंतर दोन महिन्यांनी या जोडप्याने आपल्या लाडक्या लेकाची पहिली झलक जगाला दाखवली असून त्याचे नावही जाहीर केले आहे.
विकी आणि कतरिनाने त्यांच्या मुलाचे नाव 'विहान कौशल' असे ठेवले आहे. सोशल मीडियावर मुलाच्या छोट्या हाताचा फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले, "आमचा प्रकाशाचा किरण, विहान कौशल. आमच्या प्रार्थनांचे उत्तर. आयुष्य खूप सुंदर आहे आणि आमचे जग आता पूर्णपणे बदलले आहे."
'उरी' चित्रपटाशी काय आहे कनेक्शन?
विकी आणि कतरिनाने मुलाच्या नावामागचा किस्सा सांगितला नसला तरीही चाहत्यांनी मात्र त्याचे खास कनेक्शन शोधून काढले आहे. विकी कौशलच्या करिअरला कलाटणी देणारा चित्रपट म्हणजे 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक'. या चित्रपटात विकीने मेजर विहान सिंह शेरगिल ही मुख्य भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. त्यामुळे आपल्या आयुष्यातील गाजलेल्या भूमिकेचे नाव विकीने आपल्या मुलाला दिले असावे, असा अंदाज चाहते व्यक्त करत आहेत.
'विहान' नावाचा अर्थ काय?
'विहान' हे संस्कृत भाषेतील एक अतिशय सुंदर नाव आहे. याचा अर्थ 'पहाट', 'सकाळ' किंवा 'सूर्याची पहिली किरण' असा होतो. भारतीय संस्कृतीत पहाटेच्या वेळेला अत्यंत पवित्र मानले जाते, त्यामुळे हे नाव शांती आणि सकारात्मकतेचे दर्शन घडवते. विकी-कतरिनाने मुलाचं नाव सांगताच त्यांचे चाहते आणि सेलिब्रिटींनी या नावाला पसंती दिली आहे.