एक्शन सीन शूट करताना विकी कौशलला गंभीर दुखापत, चेहऱ्यावर पडले 13 टाके
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 12:46 IST2019-04-20T12:38:42+5:302019-04-20T12:46:54+5:30
अभिनेता विकी कौशल सध्या दिग्दर्शक भानु प्रताप सिंग यांच्या हॉरर सिनेमाचे शूटिंग करतोय. या शूटिंग दरम्यान एक अपघात झाला आहे.

एक्शन सीन शूट करताना विकी कौशलला गंभीर दुखापत, चेहऱ्यावर पडले 13 टाके
अभिनेता विकी कौशल सध्या दिग्दर्शक भानु प्रताप सिंग यांच्या हॉरर सिनेमाचे शूटिंग करतोय. या शूटिंग दरम्यान एक अपघात झाला आहे. या अपघातात विकी कौशल गंभीर जखमी झाला आहे. विकीच्या चेहऱ्यावर जवळपास 13 टाके पडल्याची माहिती.
रिपोर्टनुसार गेल्या पाच दिवसांपासून गुजरातच्या वेगवेगळ्या भागात सिनेमाचे शूटिंग सुरु होते. गुरुवारी रात्री एका एक्शन सीनच्या शूटिंग दरम्यान विकी गंभीर जखमी झाला. त्याला लगेच स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर विकीला लगेच मुंबईत आणण्यात आले. विकी बरा झाल्यानंतर पुन्हा एकदा शूटिंगला सुरुवात करणार आहे.
उरी सिनेमानंतर सध्या विकी सगळ्या दिग्दर्शक आणि मेकर्सची पहिली चॉईस आहे. लवकरच तो करण जोहरच्या 'तख्त'मध्ये दिसणार आहे. 'तख्त’ या पीरियड ड्रामात अर्थात ऐतिहासिक चित्रपटात मुघल शासनकाळातील एक कथा दाखवली जाईल.
राजसिंहासनावरचे प्रेम आणि ते मिळवण्यासाठीची वाट्टेल त्या स्तराला जाण्याचे मनसुबे असे याचे कथानक असेल. शहाजहान आणि मुमताज यांच्या दोन मुलांच्या अर्थात दोन भावंडांमधील सिंहासनासाठीच्या वादाची कथा यात दिसेल. यात विकीसह रणवीर सिंग, करीना कपूर, आलिया भट्ट, जान्हवी कपूर, अनिल कपूर आणि भूमी पेडणेकर असे तगडे कलाकार आपले अभिनय कौशल्य पणाला लावताना दिसतील. रणवीर व विकी यात दोन भावांची भूमिका साकारतील. २०२० मध्ये तख्त सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येईल.