नवरा असावा तर असा...! Katrina Kaifला करवा चौथला विकी कौशलनं दिलं हे सरप्राइज, चाहते करताहेत कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 15:55 IST2022-10-18T15:54:46+5:302022-10-18T15:55:33+5:30
Katrina Kaif : अभिनेत्री कतरिना कैफ लवकरच 'फोनभूत' चित्रपटात दिसणार आहे.

नवरा असावा तर असा...! Katrina Kaifला करवा चौथला विकी कौशलनं दिलं हे सरप्राइज, चाहते करताहेत कौतुक
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) लवकरच 'फोनभूत' (Phone Bhoot) चित्रपटात दिसणार आहे. कतरिना कैफने अलीकडेच लग्नानंतरचा पहिला करवा चौथ साजरा केला, ज्याचे फोटो देखील अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. कतरिना कैफने विकी कौशलच्या दीर्घायुष्यासाठी उपवास ठेवला होता आणि ट्रेडिशनल लूक करून चंद्राची पूजाही केली होती. पहिला करवा चौथ असल्याने विक्की कौशलनेही तो खास बनवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. करवा चौथच्या दिवशीही त्याने अभिनेत्रीला सरप्राईज दिले, त्यामुळे कतरिनाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. याचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने केला आहे.
पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत कतरिना कैफने सांगितले की, विकी कौशलने तिचा पहिला करवा चौथ खास बनवला होता. कारण अभिनेत्यानेही पत्नीसाठी उपवास ठेवला होता. याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, "विकीने असे करावे अशी मला अपेक्षा नव्हती. पण त्याने स्वतः हे पाऊल उचलले जे खूप गोड होते. विकीच्या आई-वडिलांनीही त्यांच्याप्रमाणे करवा चौथ साजरी केली. हा पहिला करवा चौथ आहे."
पहिला करवा चौथ असल्याने कतरिना कैफने सर्व विधी उत्तम प्रकारे पार पाडले, मात्र चंद्राची वाट पाहत अभिनेत्रीला भूक लागली. तिने स्वतः ही गोष्ट सांगितली. याबद्दल कतरिना कैफ म्हणाली, "९.०१ पर्यंत चंद्र दिसतो. पण त्या दिवशी 9:30 पर्यंत चंद्र दिसत नव्हता. मला भूक लागली होती." मात्र, विकी कौशलनेही तिच्यासाठी उपवास ठेवल्याचे अभिनेत्रीला समजताच तिला ते खूप आवडले.