VIDEO : कतरिना कैफच्या गाण्यावर विक्की कौशलच्या एक्स गर्लफ्रेन्डने केला डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 14:54 IST2021-11-23T14:52:42+5:302021-11-23T14:54:20+5:30
Harleen Sethi : हरलीन सेठीने बेली डान्सचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. टर्टल नेक क्रॉप टॉप, ब्लॅक लेंगिग्स आणि कंबरेवर स्कार्फ लावून तिने कमाल बेली डान्स केला आहे.

VIDEO : कतरिना कैफच्या गाण्यावर विक्की कौशलच्या एक्स गर्लफ्रेन्डने केला डान्स
कतरिना कैफच्या (Katrina Kaif) नुकत्याच रिलीज झालेल्या 'सूर्यंवंशी'मध्ये तिच्यावर शू़ट करण्यात आलेलं 'टिप टिप बरसा पाणी' हे गाणं सध्या चांगलंच पसंत केलं जात आहे. गाण्यात ओरिजनल अभिनेत्री रवीना टंडन हिनेही कतरिनाचं कौतुक केलं होतं. आता या आयकॉनिक गाण्यावर विक्की कौशलची (Vicky Kaushal) एक्स-गर्लफ्रेन्ड हरलीन सेठीने (Harleen Sethi) जोरदार बेली डान्स केलाय.
हरलीन सेठीने बेली डान्सचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. टर्टल नेक क्रॉप टॉप, ब्लॅक लेंगिग्स आणि कंबरेवर स्कार्फ लावून तिने कमाल बेली डान्स केला आहे. तिने ४ तासांच्या प्रॅक्टिसनंतर बेली डान्सचा बेस्ट परफॉर्मन्स दिला आहे.
तिने कॅप्शनला लिहिलं की, 'मला जी प्रत्येक गोष्ट आव्हान देते, त्याने मला मी जिवंत असल्याची जाणीव होते. ४ तासांची रिहर्सल, एक नवा डान्स फॉर्म, एक नवीन शिक्षिका ज्यांनी मला हे शिकवण्यासाठी मेहनत घेतली. एका दिवसात हा डान्स शिकवला आणि निष्कर्ष टिप टिप बरसा पाणी'.
हरलीन सेठी ही विक्की कौशलची एक्स गर्लफ्रेन्ड आहे. आता सद्या विक्की कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. अशात हरलीनने कतरिनाच्या गाण्यावर डान्स करत व्हिडीओ शेअर करणं लोकांना मजेदार वाटत आहे.