सिंहासनारुढ छत्रपती संभाजी महाराज अन्...; विकी कौशलच्या 'छावा' सिनेमाचं नवीन पोस्टर प्रदर्शित, रिलीज डेट समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 18:38 IST2025-01-16T18:31:57+5:302025-01-16T18:38:04+5:30
छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिनाचं औचित्य साधून सिनेमाचं नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे

सिंहासनारुढ छत्रपती संभाजी महाराज अन्...; विकी कौशलच्या 'छावा' सिनेमाचं नवीन पोस्टर प्रदर्शित, रिलीज डेट समोर
विकी कौशल मुख्य भूमिकेत असलेल्या 'छावा' सिनेमाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. या सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिनाचं औचित्य साधून सिनेमाचं नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरवर विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत असून सिंहासनावर बसल्याचं दिसत आहे.
'छावा' सिनेमाच्या या नव्या पोस्टरने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पोस्टर पाहून चाहत्यांची सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. 'छावा' सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच या सिनेमाची प्रेक्षक वाट पाहत आहेत. विकी कौशलला छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. लवकरच या सिनेमाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'छावा' सिनेमात विकी कौशलसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना दिसणार आहे. लक्ष्मण उत्तेकर यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तर मोडॉक फिल्मची निर्मिती आहे. येत्या २२ जानेवारीला या भव्यदिव्य सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित केला जाणार आहे. तर १४ फेब्रुवारीला सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.