'छावा'ची रेकॉर्ड ब्रेक कमाई, लेकाचं यश पाहून भारावले विकी कौशलचे वडील, पोस्ट करत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 09:27 IST2025-04-22T09:25:07+5:302025-04-22T09:27:13+5:30

१४ फेब्रुवारीला रिलीज झालेल्या विकी कौशलच्या 'छावा'चा बोलबाला, आतापर्यंत किती कमाई केली?

Vicky Kaushal Chhaava Movie Crossed 600 Crore Father Sham Kaushal Shares Post | 'छावा'ची रेकॉर्ड ब्रेक कमाई, लेकाचं यश पाहून भारावले विकी कौशलचे वडील, पोस्ट करत म्हणाले...

'छावा'ची रेकॉर्ड ब्रेक कमाई, लेकाचं यश पाहून भारावले विकी कौशलचे वडील, पोस्ट करत म्हणाले...

Sham Kaushal On Chhaava: विकी कौशलच्या (Vicky Kaushal) 'छावा' (Chhaava Movie) चित्रपटानं केवळ प्रेक्षकांची मनं जिंकली नाहीत, तर बॉक्स ऑफिसवर (Box Office) प्रचंड नफाही मिळवला आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमीवर बनवलेल्या या चित्रपटातील विकी कौशलच्या अभिनयानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि चित्रपटाला एका नव्या उंचीवर नेलं. स्वराज्याचे धाकले धनी असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाने ६०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. विकीचे वडील आणि प्रसिद्ध अ‍ॅक्शन डायरेक्टर शाम कौशल हे लेकाच्या चित्रपटाचं यश पाहून भारावले. 

शाम कौशल यांनी 'छावा' चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टवर "६०० नॉट आऊट, ऑल टाइम ब्लॉक बस्टर. 'पुष्पा २ हिंदी', 'स्त्री २'नंतर सर्वाधिक कमाई करणारा 'छावा' हा तिसरा चित्रपट ठरला", असं लिहलेलं आहे. तर यासोबत शाम यांनी कॅप्शनमध्ये "इतके प्रेम दिल्याबद्दल देवाचे आणि सर्वांचे आभार", असं म्हटलं. शाम कौशल यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पाडला आहे. 

'पुष्पा २' आणि 'स्त्री २' नंतर भारतात हा टप्पा गाठणारा हा तिसरा हिंदी चित्रपट ठरला आहे. तर जगभरात ८०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. 'छावा' सिनेमा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडला. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनीदेखील 'छावा' सिनेमा पाहिला.  संसदेत सिनेमाचं विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी पंतप्रधान मोदींसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे इतर मंत्री आणि संसदेतील इतर राजकीय व्यक्ती सहभागी झाले होते.


विकीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर 'छावा'च्या प्रचंड यशानंतर तो येत्या वर्षात संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर' या मोठ्या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्यासोबत दिसणार आहे. हा चित्रपट मार्चमध्ये प्रदर्शित होणार आहे आणि बॉक्स ऑफिसवर यशच्या 'टॉक्सिक' सोबत टक्कर देईल. याशिवाय, विक्की 'महावतार' मध्ये देखील दिसणार आहे, जो अमर कौशिक दिग्दर्शित करत आहे. हा चित्रपट पौराणिक कथा आणि आधुनिक कथेचा एक अनोखा मिलाप असेल, अशी माहिती आहे. 

Web Title: Vicky Kaushal Chhaava Movie Crossed 600 Crore Father Sham Kaushal Shares Post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.