Vicky - Rashmika : 'छावा' चित्रपटासाठी विकी कौशल अन् रश्मिका मंदाना शिकले मराठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 16:34 IST2024-08-11T16:33:51+5:302024-08-11T16:34:33+5:30
विकी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.

Vicky - Rashmika : 'छावा' चित्रपटासाठी विकी कौशल अन् रश्मिका मंदाना शिकले मराठी
बॉलिवूडच्या सर्वात दमदार अभिनेत्यांमध्ये विकी कौशलचा (Vicky Kaushal) समावेश होतो. विकी कौशल आता 'छावा : द ग्रेट वॉरियर' (Chhava : The Great Warrior) या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रत्येक भूमिका चोख निभावण्यावर त्याचा भर असतो. या चित्रपटासाठी विकीने खूप मेहनत घेतली आहे. विकी 'छावा' चित्रपटासाठी मराठी भाषा शिकला आहे.
विकी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रश्मिक़ा मंदानाही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसेल. छत्रपती संभाजी महाराज हे मराठा नेते आणि प्रसिद्ध सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र होते. त्यामुळे कलाकारांनी त्यांच्या संवादांमध्ये काही मराठी टच दाखवणे महत्त्वाचे होते. त्यामुळे त्यांच्या पात्रांना न्याय देण्यासाठी विकी व रश्मिकाने त्यांचे मराठी उच्चार परिपूर्ण करण्यासाठी चार आठवड्यांचे प्रशिक्षण घेतले होते.
'छावा' चित्रपटात पात्रे पडद्यावर पूर्णपणे अस्सल आणि विश्वासार्ह दिसतील, याची खात्री करण्यासाठी निर्मात्यांना कोणतीही कसर सोडायची नव्हती. या चित्रपटाशिवाय रश्मिका लवकरच 'पुष्पाः द रुल' या चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये अल्लू अर्जुनही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा संपूर्ण भारतातील चित्रपट आहे. याशिवाय ती 'सिकंदर' चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.