वयाचं सोडा.. कमाईच्या बाबतीतही पती विकीपेक्षा वरचढच आहे कतरिना कैफ, जाणून घ्या तिचे Net Worth

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 15:05 IST2021-12-07T11:38:25+5:302021-12-15T15:05:26+5:30

राजस्थानमधल्या सिक्स सेंस फोर्ट बरवाडामध्ये कतरिना कैफ आणि विकी कौशल लग्न बंधनात अडकणार आहेत.

Vicky kaushal and katrina kaif wedding know about actress net worth | वयाचं सोडा.. कमाईच्या बाबतीतही पती विकीपेक्षा वरचढच आहे कतरिना कैफ, जाणून घ्या तिचे Net Worth

वयाचं सोडा.. कमाईच्या बाबतीतही पती विकीपेक्षा वरचढच आहे कतरिना कैफ, जाणून घ्या तिचे Net Worth

बॉलिवूडमधील सगळ्यात सुंदर अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि दमदार अभिनेता विकी कौशल  (Vicky Kaushal) याच शाही लग्नाची राजस्थानमध्ये जोरदार तयारी सुरु आहे. रिपोर्टनुसार कतरिना आणि विकी लग्नाच्या विधींसाठी राजस्थानमध्ये दाखल झाले आहेत. 9 डिसेंबरला सिक्स सेंस फोर्ट बरवाडामध्ये लग्न बंधनात अडकणार आहेत. विकी कौशल आणि कतरिना कैफ बराच काळ एकमेकांना डेट करत होते, पण त्यांनी कधीच त्यांच्या नात्याविषयी अधिकृत कबुली दिली नाही. 

विकीपेक्षा वयाने मोठी आहे कतरिना 
विकी कौशल आणि कतरिना कैफच्या वयात पाच वर्षांचे अंतर आहे. कॅट विकपेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे. कतरिना 38 वर्षांचे तर विकी 33 वर्षांचा आहे.त्यामुळे कतरिनाचे नाव पतीपेक्षा वयाने मोठ्या असलेल्या अभिनेत्रींच्या यादीत समिल होणार आहे. कतरिनाचे बॉलिवूडमधील कारर्कीदही विकीपेक्षा मोठी आहे.  कतरिनाने 2003 मध्ये बूम या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. बॉलिवूडमध्ये कॅट जवळपास 18 वर्षे काम करतेय. तर विक्की कौशलने 2012मध्ये बॉलिवूडमध्ये एंट्री केली. 

कतरिनाचे नेटवर्थ 
हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार कॅटचे नेटवर्थ 224 कोटी आहे ती एका सिनेमासाठी 11 कोटींचे मानधन घेते. याशिवाय कतरिनाकैफ 'के ब्युटी' या ब्रँडची मालकीण आहे. यासोबतच कतरिनाने न्याकामध्ये 4 कोटी रुपये गुंतवले होते, त्याचे तिला आता 24 कोटी रुपये मिळाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिना कैफकडे 3-4 लक्झरी कार आहेत. या यादीमध्ये रेंज रोव्हरपासून ऑडीपर्यंतचा समावेश आहे.

विकीचे नेटवर्थ 
हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार विकीचे नेटवर्थ 25 कोटी रुपये आहे, तो एका सिनेमासाठी 3 ते 4 कोटी रुपाये घेतो. विकीला ब्रँड एंडोर्समेंटसाठी 2-2.5 कोटी रुपये मिळतात. विकीच्या करिअरला 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटामुळे कलाटणी मिळाली. .
 

Web Title: Vicky kaushal and katrina kaif wedding know about actress net worth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.