Ved Song Teaser : 'वेड' तुझा गाण्याचं टीझर आलं, जेनेलिया नाही तर 'या' अभिनेत्रीसोबत रितेशचा रोमान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 17:02 IST2022-11-28T16:38:16+5:302022-12-01T17:02:33+5:30
'वेड' सिनेमाच्या एका गाण्याचे टीझर आले आहे. वेड तुझा हे Tital song टायटल सॉंग उद्या रिलीज होत आहे. पण या गाण्यात रितेश देशमुख सोबत जेनेलिया नाही तर वेगळीच अभिनेत्री दिसत आहे.

Ved Song Teaser : 'वेड' तुझा गाण्याचं टीझर आलं, जेनेलिया नाही तर 'या' अभिनेत्रीसोबत रितेशचा रोमान्स
Ved Song Teaser : रितेश देशमुख आणि जेनेलियाच्या चाहत्यांना आतुरता आहे ती वेड सिनेमाची.सिनेमाचे जबरदस्त ट्रेलर पाहून मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार भरभरुन कौतुक करताना दिसत आहेत. तर आता या सिनेमाच्या एका गाण्याचे टीझर आले आहे. वेड तुझा हे Tital song टायटल सॉंग उद्या रिलीज होत आहे. पण या गाण्यात रितेश देशमुख सोबत जेनेलिया नाही तर वेगळीच अभिनेत्री दिसत आहे.
वेड तुझा या गाण्याचे teaser टीझर ट्रेलर इतकेच तुफान व्हायरल होत आहे. अजय अतुलने गाण्याला म्युझिक दिले आहे. हे गाणे ऐकून नक्कीच मंत्रमुग्ध व्हायला होते. पण या गाण्याच्या टीझरमध्ये जेनेलिया नाही तर अभिनेत्री 'जिया शंकर' आहे. समुद्रकिनारी रितेश आणि जिया चा रोमान्स बघायला मिळत आहे. सिद्धार्थ जाधवने यावर 'जबरदस्त सर' अशी कमेंटही केली आहे.
'वेड' सिनेमा ३० डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. हा जेनेलिया आणि रितेशचा पहिलाच एकत्रित सिनेमा असणार आहे.