कोरोनावर मात केल्यानंतर नीतू कपूर आणि वरुण धवन पुन्हा सुरु करणार 'जुग जुग जियो'चं शूटिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 13:43 IST2020-12-16T13:32:45+5:302020-12-16T13:43:43+5:30
वरुण धवन आणि नीतू कपूर आणि दिग्दर्शक राज मेहता यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर सिनेमाचे शूटिंग थांबविण्यात आले होते.

कोरोनावर मात केल्यानंतर नीतू कपूर आणि वरुण धवन पुन्हा सुरु करणार 'जुग जुग जियो'चं शूटिंग
'जुग जुग जियो' सिनेमाचे शूटिंग येत्या 19 डिसेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. वरुण धवन आणि नीतू कपूर आणि दिग्दर्शक राज मेहता यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर सिनेमाचे शूटिंग थांबविण्यात आले होते. आता या तिघांचेही रिपोर्ट नेगेटीव्ह आले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा शूटिंगला सुरुवात केली जाणार आहे.
मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, 'तिघांनी ज्या ठिकाणी शूटिंग केली होती त्या सर्व ठिकाणाचं सैनिटाइजेशन करण्यात आले आहे. क्रू मेंबर्सनाही देखील आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. आता तिघेही बरे झाल्या आहेत, त्यामुळे शूटिंग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चित्रपटाचे शूटिंग 19 डिसेंबरपासून चंदीगडमध्ये सुरू होणार आहे. नीतू कपूर 4 ते 5 दिवसांसाठी जॉईन करणार आहेत तर इतर कलाकार 30 डिसेंबरपर्यंत शूटिंग करणार आहेत.
18 डिसेंबरला 'जुग जुग जियो'ची स्टारकास्ट पुन्हा चंदीगडला रवाना होणार आहे. राज मेहता दिग्दर्शित ‘जुग जुग जिओ’ हा चित्रपट एक रोमँटिक विनोदी चित्रपट आहे.आपल्या करिअरमध्ये पहिल्यांदाच अनिल कपूर आणि नीतू कपूर यांची जोडी रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे चित्रपटात कियारा आणि वरुण धवन यांच्याही भूमिका आहेत.