Varun Dhawan : वरुण धवनने भाड्याने घेतलं हृतिक रोशनचं घर! लवकरच होणार अक्षय कुमारचा शेजारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 15:26 IST2024-06-10T15:26:39+5:302024-06-10T15:26:58+5:30
सध्या वरुण धवन हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Varun Dhawan : वरुण धवनने भाड्याने घेतलं हृतिक रोशनचं घर! लवकरच होणार अक्षय कुमारचा शेजारी
वरुण धवन आजच्या पिढीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सध्या वरुण धवन हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकतेच वरुण धवन बाबा झाला आहे. वरुणची पत्नी नताशा हिने एका मुलीला जन्म दिला. आता वरुण धवन लवकरच आपल्या लाडक्या लेकीसह एका नव्या घरी शिफ्ट होणार आहे. वरुण धवन लवकरच जुहू येथे शिफ्ट होणार आहे.
वरुण धवनने मुंबईतील जुहू भागात सी फेसिंग असलेला हृतिक रोशनचा अपार्टमेंट भाड्याने घेतला आहे. लवकरच वरुण हृतिक रोशनच्या घरात शिफ्ट होणार असल्याची माहिती आहे. हृतिक रोशनचा अपार्टमेंट ज्या इमारतीमध्ये आहे, त्याच इमारतीमध्ये अक्षय कुमार आणि साजिद नाडियादवाला देखील राहतात. आता ते वरुण धवनचे शेजारी बनतील.
वरुण धवन हा बाळाचा जन्म झाल्यानंतर नव्या घरात शिफ्ट होणार आहे. सध्या वरुण धवन आणि नताशा जुहूमध्ये एका अपार्टमेंटमध्ये राहत आहे. हे घर त्याने २०१७ मध्ये विकत घेतले होते. तर रिपोर्टनुसार, वरुण धवन आता ज्या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होणार आहे, त्या हृतिकच्या अपार्टमेंटची किंमत १०० कोटी रुपये आहे.
वरुण धवन आज करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे. Moneycontrol.com च्या रिपोर्टनुसार, अभिनेत्याची एकूण संपत्ती ३८१ कोटींची आहे. चित्रपटांसोबतच वरुणच्या उत्पन्नाचा स्रोत जाहिरातीदेखील आहेत. ज्यासाठी तो २ कोटी रुपये घेतो. वरुण धवनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, वरुण शेवटचा 'बवाल' या चित्रपटात दिसला होता. त्यानंतर बऱ्याचा काळानंतर वरुण आता 'स्त्री २' चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. वरुण धवनच्या नवीन चित्रपटासाठी चाहते उत्सुक आहेत.