"सकाळी ७.३० वाजता मी दारु प्यायलो अन्..." वरुण धवनने सांगितली मजेशीर आठवण, तुम्हालाही येईल हसू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 11:05 IST2025-10-01T11:04:59+5:302025-10-01T11:05:37+5:30
वरुण धवनने सकाळी लवकर दारु प्यायल्यावर काय घडलं? याचा एक मजेशीर किस्सा सर्वांसोबत शेअर केला आहे. काय म्हणाला अभिनेता?

"सकाळी ७.३० वाजता मी दारु प्यायलो अन्..." वरुण धवनने सांगितली मजेशीर आठवण, तुम्हालाही येईल हसू
अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) सध्या त्याचा आगामी चित्रपट 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशनदरम्यान, वरुणने त्याच्या 'जुग जुग जियो' (JugJugg Jeeyo) चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक अत्यंत मजेदार किस्सा सांगितला आहे. जुग जुग जियोच्या सेटवर वरुण धवनला एका सीनदरम्यान दारु प्यावी लागली होती. पुढे काय घडलं? जाणून घ्या
एका मुलाखतीत वरुणला 'सेटवर घडलेला सर्वात विचित्र क्षण' कोणता, असं विचारण्यात आलं. तेव्हा त्याने 'जुग जुग जियो'च्या क्लायमॅक्स सीनची आठवण सांगितली. वरुणने खुलासा केला की, अनिल कपूर यांच्यासोबत एक क्लायमॅक्स सीन शूट करायचा होता, ज्यात त्याच्या भूमिकेतील व्यक्तीला दारु पिऊन नशेत संवाद बोलायचे होते. सीनमध्ये नैसर्गिकपणा आणण्यासाठी त्याने सकाळी ७:३० वाजल्यापासून अभिनेता मनीष पॉलसोबत दारू प्यायला सुरुवात केली.
वरुण म्हणाला, "अनिल सरांसोबतच्या त्या क्लायमॅक्स सीनमध्ये मला नशेत येऊन माझे संवाद म्हणायचे होते. त्यामुळे आम्हाला खरोखरच दारुच्या नशेत असणं आवश्यक होतं. आम्ही सकाळी ७:३० वाजता दारु पिण्यास सुरुवात केली. मनीष आणि मी सकाळीच प्यायला सुरुवात केली आणि दुपारपर्यंत आमची जीभ अडखळायला लागली."
वरुणने पुढे सांगितले की, ''तो सीन एका दिवसात पूर्ण झाला नाही. त्यामुळे मला दुसऱ्या दिवशीही दारू पिऊनच सेटवर यावं लागलं. मला शुद्धीवर यायचं होतं, पण सीन पूर्ण न झाल्यामुळे दुसऱ्या दिवशीही मला तेच करावं लागलं," असं त्याने सांगितले. भूमिका चांगली रंगवण्यासाठी कलाकाराला करावी लागणारी ही 'कसरत' वरुणने गंमतीशीरपणे शेअर केली. सध्या वरुण धवन हा जान्हवी कपूर, सान्या मल्होत्रा आणि रोहित सराफ यांच्यासह त्याचा आगामी चित्रपट 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'च्या रिलीजची तयारी करत आहे. हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.