Ind vs Eng Semi Final: भारत जिंकला पण वरुण धवन का चिडला? स्टेडियमबाहेर काय घडलं? व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 08:55 IST2026-03-06T08:54:01+5:302026-03-06T08:55:08+5:30

काल भारत विरुद्ध इंग्लंड या दोन संघात क्रिकेट विश्वचषक T 20  मध्ये सेमी फायनलचा सामना रंगला. सामना संपल्यावर मात्र अभिनेता वरुण धवन चांगलाच चिडलेला दिसला. काय घडलं नेमकं?

varun dhawan angry outside wankhede stadium on Ind vs Eng Semi Final t 20 match | Ind vs Eng Semi Final: भारत जिंकला पण वरुण धवन का चिडला? स्टेडियमबाहेर काय घडलं? व्हिडिओ व्हायरल

Ind vs Eng Semi Final: भारत जिंकला पण वरुण धवन का चिडला? स्टेडियमबाहेर काय घडलं? व्हिडिओ व्हायरल

काल भारत विरुद्ध इंग्लंड या दोन संघात क्रिकेट विश्वचषक T 20  मध्ये सेमी फायनलचा सामना रंगला. या सामन्यात भारताने बाजी मारलेली दिसली. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना उत्कंठावर्धक झाला होता. परंतु भारताने अखेर इंग्लंडच्या तोंडचा विजयाचा घास हिरावून घेतला. हा सामना पाहायला क्रिकेट क्षेत्रातील दिग्गजांपासून बॉलिवूडसेलिब्रिटी आले होते. सामना संपल्यावर मात्र अभिनेता वरुण धवन चांगलाच चिडलेला दिसला. काय घडलं नेमकं?

वरुण धवनचा राग अनावर, कारण...

भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट विश्वचषक T 20  सेमी फायनल बघायला वरुण धवन स्टेडियममध्ये उपस्थित होता. वरुणची उपस्थिती सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. सामना संपल्यावर वरुण त्याच्या गाडीत बसून घरी जाण्याच्या विचारात होता त्यावेळी स्टेडियमबाहेर त्याला चाहत्यांनी चांगलंच घेरलं. चाहत्यांनी वरुणभोवती गराडा घातला. अनेक चाहते वरुण धवनच्या अगदी जवळ येऊन फोटो काढण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे वरुणला नीट चालता येत नव्हतं. त्याने चिडून एका चाहत्याच्या मोबाईलवर फटकाही मारला.




अखेर सुरक्षारक्षकांनी सर्वांना बाजूला केलं आणि वरुणला व्यवस्थित पुढे घेऊन गेले. एकूणच चाहत्यांनी अचानक घेरल्याने आणि धक्काबुक्की केल्याने वरुण धवनचा पारा चांगलाच वाढला होता. दरम्यान काल Ind vs Eng Semi Final पाहायला वरुण धवन उपस्थित होता. भारताने सामना जिंकल्यावर वरुणने एकच जल्लोष केला. वरुण धवनसोबतच आलिया भट, रणबीर कपूर हे कलाकारही सामना पाहायला वानखेडे स्टेडियमवर उपस्थित होते. रोमहर्षक सामन्यात भारताना चिअर अप करायला सर्वजण उत्साही होते.

Web Title : Ind vs Eng सेमी-फ़ाइनल: भारत जीता, वरुण धवन क्यों नाराज़ थे?

Web Summary : भारत ने इंग्लैंड के खिलाफ सेमीफाइनल जीता। स्टेडियम के बाहर प्रशंसकों की भीड़ ने अभिनेता वरुण धवन को घेर लिया, जिससे उन्हें चलने में मुश्किल हुई, इसलिए वह नाराज़ हो गए।

Web Title : Ind vs Eng Semi-Final: India Wins, Why Was Varun Dhawan Angry?

Web Summary : India won the semi-final against England. Actor Varun Dhawan got angry after fans mobbed him outside the stadium, making it difficult for him to move.