'आर्टिकल ३७०' नंतर वैभव तत्त्ववादीचा नवा हिंदी सिनेमा, दिसणार 'ही' कथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 15:40 IST2024-07-19T15:38:39+5:302024-07-19T15:40:27+5:30
'आर्टिकल ३७०' नंतर वैभव तत्तवादीच्या आगामी हिंदी सिनेमाची घोषणा झालीय. या सिनेमाची कथा एकदम हटके असणार आहे (vaibhav tatwawadi, a wedding story)

'आर्टिकल ३७०' नंतर वैभव तत्त्ववादीचा नवा हिंदी सिनेमा, दिसणार 'ही' कथा
वैभव तत्तवादी हा मराठी मनोरंजन विश्वातील गुणी अभिनेता. वैभवला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. वैभवने मराठी मालिका, सिनेमे गाजवले आहेतच शिवाय 'बाजीराव मस्तानी', 'हंटर' अशा बॉलिवूड सिनेमांमध्येही जबरदस्त अभिनय केलाय. अलीकडेच वैभवने यामी गौतमसोबत 'आर्टिकल ३७०' सिनेमात काम करुन भूमिका गाजवली. या सिनेमानंतर वैभवच्या आगामी हिंदी सिनेमाची घोषणा झालीय. 'अ वेडिंग स्टोरी' असं या सिनेमाचं नाव आहे.
वैभवच्या नव्या सिनेमाची कथा काय?
अभिनव पारीक दिग्दर्शित 'अ वेडिंग स्टोरी' सिनेमात वैभव तत्ववादी प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमाच्या पोस्टरवर नजर गेल्यास तुम्हाला कळेल की, शुभो शेखर भट्टाचार्जी यांनी हा सिनेमा लिहिला आहे. या सिनेमातून थरारक भयपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एका आनंदी वैवाहिक जीवनाला काही दिवसांनी अशुभ घटनांना कसं सामोरं जावं लागतं, याची रोमांचक कहाणी प्रेक्षकांना या सिनेमातून बघायला मिळणार आहे.
वैभव तत्ववादीचा नवीन सिनेमा कधी रिलीज होणार?
प्रेम आणि जगण्याची ही थरारक कहाणी प्रेक्षकांना खुर्चीवर खिळायला भाग पाडणार एवढं नक्की. मृत्यूला झुगारून नवविवाहीत दांपत्य आनंदी जीवन जगू शकतील का, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सिनेमा पाहून कळेल. ३० ऑगस्ट २०२४ रोजी थिएटरमध्ये 'अ वेडिंग स्टोरी' सिनेमा रिलीज होणार आहे. वैभव तत्ववादीचे फॅन्स पुन्हा एकदा त्याच्या लाडक्या अभिनेत्याला बॉलिवूड सिनेमात पाहायला उत्सुक असतील यात शंका नाही.