'एक दिवस तू...'; शाहरुखविषयी नाना पाटेकरांनी केली होती 'ही' भविष्यवाणी, अखेर खरं ठरलं अभिनेत्याचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 14:36 IST2023-09-28T14:35:25+5:302023-09-28T14:36:00+5:30

Nana patekar: नाना पाटेकर आणि शाहरुख यांनी एक सिनेमात एकत्र काम केलं होतं.

vaccine-war-actor-nana-patekar-spoke-about-shah-rukh-khan-says-he-has-no-issues-with-jawan-actor | 'एक दिवस तू...'; शाहरुखविषयी नाना पाटेकरांनी केली होती 'ही' भविष्यवाणी, अखेर खरं ठरलं अभिनेत्याचं वक्तव्य

'एक दिवस तू...'; शाहरुखविषयी नाना पाटेकरांनी केली होती 'ही' भविष्यवाणी, अखेर खरं ठरलं अभिनेत्याचं वक्तव्य

मराठीसह हिंदी कलाविश्वावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणजे नाना पाटेकर (nana patekar) . दर्जेदार अभिनयशैली आणि भारदस्त आवाज यांमुळे नाना पाटेकर यांनी अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. गेले कित्येक वर्ष सिनेसृष्टीत काम करणाऱ्या नानानांचा 'द व्हॅक्सिन वॉर' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला.  या सिनेमाच्या निमित्ताने त्यांनी अलिकडेच एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्यांनी शाहरुख खानविषयी (shahrukh khan) भाष्य केलं. त्यांचं हे वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे.

मध्यंतरी नाना पाटेकरांनी एका सिनेमाविषयी मोठं वक्तव्य केलं होतं. ‘नुकताच एक चित्रपट पाहायला गेलो, पण तो धड पूर्ण पाहूही शकलो नाही.’ असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याचा संबंध शाहरुखच्या 'जवान'शी जोडला होता.  त्यानंतर आता त्यांनी शेट शाहरुखवरच भाष्य केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हे दोन्ही कलाकार चर्चेत आले आहेत.


नाना पाटेकरांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांना शाहरुखविषयी काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर नानांनी शाहरुखचं कौतुक केलं. "तो खूप चांगला अभिनेता आहे. 'राजू बन गया जंटलमन' या सिनेमात आम्ही एकत्र काम केलं होतं.  या सिनेमाच्या वेळी मी त्याला सांगितलं होतं. एक दिवस तू मोठा स्टार बनशील, तुम्ही हे त्यालाही विचारा", असं नाना म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "आम्ही आजही एकमेकांना भेटतो. जेव्हा केव्हा भेटतो तेव्हा पूर्वीसारखेच भेटतो. आमच्यात काहीही वैर नाही. तो माझा लहान भाऊ आहे. मग माझं त्याच्याशी वैर कसं असेल?"

दरम्यान,  नाना पाटेकर यांचा द व्हॅक्सीन वॉर हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमात त्यांच्यासोबत अनुपम खेर, रायमा सेन, सप्तमी गौडा, पल्लवी जोशी य़ांनी स्क्रीन शेअर केली आहे. हा सिनेमा हिंदीसह तामिळ आणि तेलुगू भाषेतही रिलीज झाला आहे.

Web Title: vaccine-war-actor-nana-patekar-spoke-about-shah-rukh-khan-says-he-has-no-issues-with-jawan-actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.