Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाचा 'बेशरम रंग', लाल साडीत व्हिडिओ केला शेअर, युझर्स म्हणाले, 'रिषभ पंत....
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 15:36 IST2023-01-11T14:54:17+5:302023-01-11T15:36:04+5:30
उर्वशी मुद्दामून असे पोस्ट टाकते की तिचे नाव रिषभसोबत जोडले जाते. आता उर्वशीच्या नव्या व्हिडिओवरुनही तिला ट्रोल करण्यात येत आहे.

Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाचा 'बेशरम रंग', लाल साडीत व्हिडिओ केला शेअर, युझर्स म्हणाले, 'रिषभ पंत....
भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत (Rishabh Pant) आणि मॉडेल उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा असते. रिषभ पंत सध्या मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात उपचार घेत आहे. आता रिषभ पंतचा विषय असेल तर उर्वशची चर्चा तर होणारच. उर्वशी सुद्धा मुद्दामून असे पोस्ट टाकते की तिचे नाव रिषभसोबत जोडले जाते. आता उर्वशीच्या नव्या व्हिडिओवरुनही तिला ट्रोल करण्यात येत आहे.
उर्वशी नुकतीच एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये पोहोचली होती. तिने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यात तिने लाल रंगाची नेट ची साडी नेसली आहे. तर त्यावर स्टायलिश ब्लाऊज घातला आहे. व्हिडिओ ला बेशरम रंग (Besharam Rang) हे गाणे लावले आहे. तर कॅप्शन मध्येही किने गाण्याचे बोल लिहिले आहेत. 'हमे तो लुट लिया मिलके इश्क वालो ने' असे तिने व्हिडिओ खाली लिहिले आहे.
उर्वशीची एक पोस्ट पडली की युझर्सचा कमेंटमध्ये सुळसुळाट असतो. अर्ध्या पेक्षा जास्त कमेंट मध्ये तर रिषभ पंतचाच उल्लेख असतो.
मेगास्टार चिरंजीवी यांच्या वॉल्टेअर वीरैय्या या सिनेमात उर्वशीने आयटम सॉंग केले आहे. याच सिनेमाच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये उर्वशी पोहोचली होती. लाल रंगाच्या साडीत उर्वशीवरुन नजरही हटत नव्हती. तिने स्टेजवर येऊन चिरंजीवी यांचे आभरही मानले. मात्र कमेंटमध्ये युझर्सच्या दुसऱ्याच गप्पा सुरु झाल्या. 'रिषभ भाई मिस यू, अशाच पोस्ट कर म्हणजे तुला पाहून रिषभ लवकर बरा होईल' अशा भन्नाट कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.