Urvashi Rautela: चाहत्यांची आवडती स्टार ठरली अभिनेत्री, दुबईत मिळाला 'हा' अवॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 18:12 IST2025-09-12T18:10:08+5:302025-09-12T18:12:05+5:30

उर्वशी रौतेलाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत तिला अवॉर्ड मिळाल्याचा आनंद व्यक्त केला.

Urvashi Rautela received fans favorite star award in dubai at gama awards | Urvashi Rautela: चाहत्यांची आवडती स्टार ठरली अभिनेत्री, दुबईत मिळाला 'हा' अवॉर्ड

Urvashi Rautela: चाहत्यांची आवडती स्टार ठरली अभिनेत्री, दुबईत मिळाला 'हा' अवॉर्ड

अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) हिंदी तसंच साउथ सिनेमांमध्ये सक्रीय असते. 'मिस दिवा युनिव्हर्स' उर्वशीच्या सौंदर्यावर तरुणाई फिदा असते. इन्स्टाग्रामवर तर तिचे तब्बल ७० मिलियन फॉलोअर्स आहेत. उर्वशीचे चाहते फक्त भारतातच नाही तर जगभरात आहेत. उर्वशीला चाहत्यांच्या प्रेमाची जणू पावतीच आता मिळाली आहे. नुकतंच दुबईत उर्वशीला Fans Favourite Star Actress Award ने तिला सम्मानित करण्यात आले. 

उर्वशी रौतेलाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत तिला अवॉर्ड मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. तिने एक छानसा व्हिडिओही शेअर केला आहे. यासोबत तिने लिहिले, "Fans Favourite Star Actress Award मिळाला याचा मला खूप आनंद आहे. हा अवॉर्ड खरं तर तुम्हा सगळ्यांचा आहे. अनेक लोक मला विचारतात की मी कधीच कोणाविरोधात का बोलत नाही? याचं कारण म्हणजे माझ्यामागे तुमच्यासारखे स्ट्राँग, प्रामाणिक चाहते आहेत. तुमचा पाठिंबा, अभिमान आणि तुमचं प्रेम मला नेहमीच माझ्यासोबत असतं आणि हा अवॉर्ड आपल्यातलं घट्ट नात्याचंच प्रतीक आहे. मला तुमची फेवरेट स्टार बनवल्याबद्दल आभार."


उर्वशीच्या चाहत्यांनीही सोशल मीडियावर तिचा हा विजय साजरा केला आहे. हा GAMA अवॉर्ड सोहळा दुबई येथे पार पडला. उर्वशीने सर्व चाहत्यांचे आभार मानले. Our queen did it again अशा प्रकारे चाहत्यांनी तिला चीअर केलं आहे.

वर्कफ्रंट

उर्वशी 'डाकू महाराज' या साउथ सिनेमात दिसली. यातलं तिचं 'डिबीडी डिबीडी' आयटम साँग गाजलं. तर गेल्यावर्षी तिचा JNU सिनेमा आला होता. तसंच यंदाही तिने कान्समध्ये आपली जादू दाखवली.

Web Title: Urvashi Rautela received fans favorite star award in dubai at gama awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.