Urvashi Rautela : रिषभ पंतच्या तब्येतीत सुधारणा, उर्वशी रौतेला म्हणते, 'त्याचा देशाला...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 15:27 IST2023-02-17T15:22:33+5:302023-02-17T15:27:21+5:30
काही दिवसांपूर्वीच रिषभने फोटो पोस्ट करत त्याच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे अपडेट दिले.

Urvashi Rautela : रिषभ पंतच्या तब्येतीत सुधारणा, उर्वशी रौतेला म्हणते, 'त्याचा देशाला...'
Urvashi Rautela : भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचा मागील वर्षाच्या अखेरीस अपघात झाला होता. अपघातानंतर सुरूवातीला उत्तराखंडमधील डेहराडून येथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर पंतवर मुंबईत उपचार सुरू होते. लक्षणीय बाब म्हणजे पंतची रिकव्हरी जलद गतीने सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच रिषभने फोटो पोस्ट करत त्याच्या तब्येतीचे अपडेट दिले. आता यावर उर्वशीनेही प्रतिक्रिया दिली आहे.
Rishabh Pant: "एक पाऊल पुढे, एक पाऊल मजबूत...", रिषभ पंतने शेअर केला फोटो, कॅप्शननं जिंकली मनं
अभिनेत्री उर्वशी रौतेला नुकतीच मुंबई विमानतळावर दाखल झाली. यावेळी पापाराझींनी तिचे फोटो, व्हिडिओ काढण्यासाठी गर्दी केली. दरम्यान पापाराझींनी तिला विचारले, 'उर्वशी मॅडम इन्स्टावर फोटो पाहिले का?' यावर उर्वशी विचारते, 'कोणते फोटो?' पापाराझी म्हणतात, रिषभ पंतने फोटो पोस्ट केले आहेत, सर आता बरे होत आहेत. यावर उर्वशी म्हणत, 'देशाला त्याचा अभिमान वाटतो.' हे ऐकून पापाराझी म्हणतात 'नक्कीच आम्ही प्रार्थना करतो त्याच्यासाठी.' उर्वशी म्हणते, मी देखील करते.'
Rishabh Pant: ४८ दिवस बॅटला हात लावला नाही, तरीही रिषभ पंतच नंबर १! पाहा कसं काय?
उर्वशी आणि रिषभ पंतची चर्चा सुरु असतानाच आता उर्वशीने 'नसीम शाह' या पाकिस्तानी क्रिकेटरला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देत नवी चर्चा ओढवून घेतली आहे. मात्र आजही रिषभ पंत म्हणलं की उर्वशीचा विषय काढल्याशिवाय नेटकऱ्यांनाही राहवत नाही.