Meera Rautela : 'काळजी करु नको बेटा, सगळं ठीक...'रुग्णालयाचा फोटो शेअर करत उर्वशीच्या आईची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 14:49 IST2023-01-09T14:48:23+5:302023-01-09T14:49:02+5:30
रिषभ पंतचा विषय असेल तर उर्वशची चर्चा तर होणारच. पण आता ही चर्चा केवळ उर्वशी आणि रिषभपुरती मर्यादित राहिलेली नाही. तर आता यात उर्वशीची आई मीरा रौतेला यांचीही एंट्री झाली आहे.

Meera Rautela : 'काळजी करु नको बेटा, सगळं ठीक...'रुग्णालयाचा फोटो शेअर करत उर्वशीच्या आईची पोस्ट चर्चेत
Meera Rautela : भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत (Rishabh Pant) आणि मॉडेल उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा असते. रिषभ पंत सध्या मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात उपचार घेत आहे. आता रिषभ पंतचा विषय असेल तर उर्वशची चर्चा तर होणारच. पण आता ही चर्चा केवळ उर्वशी आणि रिषभपुरती मर्यादित राहिलेली नाही. तर आता यात उर्वशीची आई मीरा रौतेला (Meera Rautela) यांचीही एंट्री झाली आहे.
रिषभ पंत याला अधिक उपचारांसाठी देहराडून येथून मुंबई येथे आणण्यात आले आहे. पंतवर आता पुढील उपचार मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रिषभसाठी क्रिकेटपासून ते बॉलीवूड आणि राजकीय जगतातील सेलिब्रिटींनीही तो लवकरात लवकर तंदुरूस्त व्हावा, यासाठी सदिच्छा आणि प्रार्थना केल्या आहेत. याच दरम्यान उर्वशीच्या आईनेही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. मात्र असे केल्याने नेटकऱ्यांनी मीरा रौतेला यांना फटकारले होते.
तर दुसरीकडे उर्वशीने कोकीलाबेन रुग्णालयाबाहेरचा फोटो शेअर केला आणि सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले होते. उर्वशी रिषभ पंत ला भेटली का असा प्रश्न सर्व नेटकऱ्यांना पडला. आता हाच फोटो उर्वशीच्या आईने पोस्ट केला आहे लिहिले, 'काळजी करु नको बेटा सगळं ठीक होईल'.
दरम्यान, अभिनेत्री उर्वशी रौतेला अनेकदा तिच्या पोस्टमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. अनेक दिवसांपासून पंतवरून तिला ट्रोल केले जात आहे. ऋषभ पंतच्या अपघातानंतर उर्वशी रौतेलाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. ती पोस्ट चांगलीच व्हायरल झाली. त्याच्या कॅप्शनमध्ये उर्वशीने लिहिले- 'मी प्रार्थना करत आहे.' यावरून यूजर्सने तिला ट्रोल केले. यानंतरही उर्वशी रौतेलाच्या काही ट्विट्स किंवा पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र आता तिच्या आईची पोस्ट चर्चेत आहे.