VIDEO : अखेर उर्वशी रौतेला नरमली! रिषभ पंतला हात जोडून म्हणाली, I am Sorry !!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 18:21 IST2022-09-13T18:06:26+5:302022-09-13T18:21:58+5:30
Urvashi Rautela, Rishabh Pant : होय, कदाचित उर्वशी रिषभसोबत पॅचअप करण्याच्या मूडमध्ये दिसतेय. तिचा ताजा व्हिडीओ पाहून तरी हेच वाटतंय...

VIDEO : अखेर उर्वशी रौतेला नरमली! रिषभ पंतला हात जोडून म्हणाली, I am Sorry !!
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela ) गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. कधी भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंतमुुळे (Rishabh Pant) तर कधी पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शाह (Naseem Shah) याच्यामुळे. भारताचा यष्टिरक्षक रिषभ पंतसोबतचं तिचं ‘वाक् युद्ध’ तर चांगलंच गाजतंय. पण आता कदाचित उर्वशी रिषभसोबत पॅचअप करण्याच्या मूडमध्ये दिसतेय. होय, तिचा ताजा व्हिडीओ पाहून तरी हेच वाटतंय.
काही दिवसांआधी उर्वशीने रिषभ पंतला जाम डिवचलं होतं. अगदी रिषभ पंतला ‘छोटू भैय्या’ म्हणत तिने त्याची टर उडवली होती. यानंतर रिषभनेही तिला सडेतोड उत्तर दिलं होतं. हा वाद गेल्या काही दिवसांपासून सतत गाजतोय. या वादाची सुरूवात झाली होती ती एका व्हिडीओने.
Urvashi speaking about Rishabh Pant 😅#UrvashiRautelapic.twitter.com/SXPlY85KPl
— Nisha Kashyap (@nishakashyapp) August 9, 2022
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर उर्वशीच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता आणि यात उर्वशी अप्रत्यक्षपणे रिषभवर बोलली होती. ‘तो मला भेटण्यासाठी 12-14 तास थांबला होता व त्याने मला 60 मिस्ड कॉल दिले होते,’असं उर्वशी म्हणाली होती. उर्वशीच्या या मुलाखतीच्या व्हिडीओवर रिषभने जळजळीत प्रतिक्रिया दिली होती. ‘ प्रसिद्धीसाठी काही लोकांना मुलाखतीत खोटं बोलताना पाहून, गंमत वाटतेय...’,असं तो म्हणाला होता. यावर उर्वशी गप्प कशी राहणार होती? तिने यावर प्रत्युत्तर देत रिषभला छोटू भैय्या म्हटलं होतं. ‘छोटू भैया को बैट बॉल खेलना चाहिए. मैं कोई मुन्नी नहीं हूं डार्लिंग बच्चे तेरे लिए बदनाम होने को...,’ असं ती म्हणाली होती.
उर्वशी व रिषभ यांच्यातील या शाब्दिक युद्धाची मीडियात खमंग चर्चा रंगली होती. पण आता कदाचित उर्वशीला हा वाद निकाली काढायचा आहे.
उर्वशीने मागितली माफी
होय, रिषभ पंतसोबतचा वाद उर्वशीला कदाचित आणखी पुढे वाढवायला नको आहे. नुकत्याच एका मुलाखतीत तिला आरपीला (रिषभ पंत) काही मॅसेज देऊ इच्छिते का? असा प्रश्न केला गेला. यावर, मी काहीही म्हणू इच्छित नाही, असं ती आधी म्हणते. पण नंतर लगेच अगदी हात जोडून सॉरी, आय एम सॉरी म्हणते. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. आली जागेवर, असं एकाने लिहिलं आहे. तर सब गोलमाल है अशी कमेंट एकाने केली आहे.