"चेंगराचेंगरीतून राजापर्यंत पोहोचण्याचं धाडस आम्ही केलं, पण...", 'लालबागचा राजा'च्या दर्शनाला गेलेल्या तुषार कपूरला आला असा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 12:44 IST2025-09-05T12:43:14+5:302025-09-05T12:44:13+5:30

लालबागचा राजाच्या दर्शनानंतर तुषार कपूर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याचा अनुभव सांगितला आहे. 

tushar kapoor seeks blessings of lalbaugcha raja shared experience | "चेंगराचेंगरीतून राजापर्यंत पोहोचण्याचं धाडस आम्ही केलं, पण...", 'लालबागचा राजा'च्या दर्शनाला गेलेल्या तुषार कपूरला आला असा अनुभव

"चेंगराचेंगरीतून राजापर्यंत पोहोचण्याचं धाडस आम्ही केलं, पण...", 'लालबागचा राजा'च्या दर्शनाला गेलेल्या तुषार कपूरला आला असा अनुभव

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील लालबागमधील प्रसिद्ध आणि नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या लालबागचा राजाचं अनेक सेलिब्रिटींनी दर्शन घेतलं. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही बाप्पाच्या दरबारात हजेरी लावली. आता बॉलिवूड अभिनेता तुषार कपूरनेही लालबागचा राजाचं दर्शन घेतलं. लालबागचा राजाच्या दर्शनानंतर तुषार कपूर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याचा अनुभव सांगितला आहे. 

तुषारने लालबागचा राजाच्या दरबारातून काही फोटो शेअर केले आहेत. "चेंगराचेंगरीतून लालबागचा राजापर्यंत पोहोचण्याचं धाडस आम्ही यावेळी केलं. पण बाप्पाने आम्हाला पाहिलं आणि हे सगळं नेहमीप्रमाणे सार्थकी लागलं", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. तुषारच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. 


तुषार कपूर हा बॉलिवूडमधला प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता आहे. 'गोलमाल', 'क्या कूल है हम', 'गुडबॉय बॅडबॉय', 'ढोल', 'कुछ तो है', 'शोर इन द सिटी', 'शूटआऊट अॅट लोखंडवाला', 'सिंबा' अशा सुपरहिट सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे. याशिवाय अनेक चित्रपटांची त्याने निर्मितीही केली आहे.  

Web Title: tushar kapoor seeks blessings of lalbaugcha raja shared experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.